5 February 2025 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक टॉप कंपन्यांचे शेअर्स मजबूत (NSE: IRFC) घसरले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. स्टॉक मार्केटमधील मंगळवारच्या घसरणीचा फटका IRFC शेअरला सुद्धा बसला होता. (आयआरएफसी लिमिटेड कंपनी अंश)

मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी IRFC शेअर 4.62 टक्के घसरून 138 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1 टक्के वाढून 139.05 रुपयांवर पोहोचला होता. मागील ५ दिवसांत IRFC शेअर ८ टक्क्यांनी घसरला आहे. तसेच मागील १ महिन्यात IRFC शेअर १२% घसरला आहे.

शेअर्समध्ये 37 टक्क्यांची करेक्शन
आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरने सप्टेंबर तिमाहीत २२९ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता आणि तीच पातळी IRFC शेअरसाठी नजीकच्या काळातील विक्रमी उच्चांक बनला आहे. विशेष म्हणजे जुलैमधील विक्रमी पातळीवरून IRFC लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये ३७ टक्क्यांची करेक्शन दिसून आली आहे.

IRFC शेअर्सची छोट्या गुंतवणूकदारांकडून खरेदी
आयआरएफसी लिमिटेड कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत छोट्या गुंतवणूकदारांचा आकडा 54.5 लाखांवर पोहोचला होता. वार्षिक आधारावर IRFC लिमिटेड कंपनीमधील रिटेल शेअरहोल्डर्सची संख्या दुप्पट झाली आहे. कारण सप्टेंबर 2023 मध्ये हा आकडा 26 लाख होता.

तसेच टक्केवारीनुसार जूनमहिन्यात IRFC लिमिटेड कंपनीमधील रिटेल गुंतवणूकदारांचा हिस्सा ९.३५ टक्क्यांवरून ९.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, म्युच्युअल फंड कंपन्यांनी IRFC लिमिटेड शेअर्समधील हिस्सा कमी केला आहे. जून मध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांची हिस्सेदारी ०.५५ टक्क्यांवरून घसरून ०.१५ टक्के झाली आहे. तर FII चा हिस्सा १.१ टक्क्यांवर स्थिर आहे.

शेअरने दिलेला परतावा
मागील ६ महिन्यात IRFC शेअर 4.23% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 91.14% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 456% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 37% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price 22 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x