21 April 2025 10:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. पीएसयू आयआरएफसी शेअरबाबत ब्रोकरेज फर्मने सुद्धा तेजीचे संकेत दिले आहेत. शुक्रवारी आयआरएफसी कंपनीचा शेअर ०.४५ टक्क्यांनी घसरून १५२.१५ रुपयांवर पोहोचला होता. सध्या आयआरएफसी कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,93,937 कोटी रुपये आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)

आयपीओनंतर आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा शेअर हा सर्वात जास्त चर्चेत असलेला पीएसयू शेअर आहे. जानेवारी 2021 मध्ये आयपीओ सूचिबद्ध झाल्यानंतर या शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली आहे.

आयआरएफसी शेअरचा उच्चांकी स्तर

आयआरएफसी कंपनीने आयपीओमध्ये या शेअरची प्राईस बँड २६ रुपये होती. तेव्हापासून आयआरएफसी कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना ८०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. १५ जुलै २०२४ रोजी आयआरएफसी शेअरने २२९.०५ रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. मात्र, मागील काही महिन्यांत आयआरएफसी शेअर या उच्चांकी पातळीवरून ३३ टक्क्यांनी घसरला आहे.

आयआरएफसी शेअरबाबत तज्ज्ञांचे मत

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून आयआरएफसी शेअर्समधील गुंतवणूक फायद्याची असल्याचे म्हटले आहे. आयआरएफसी शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञ गौरांग शहा यांनी सांगितले की, ‘रेल्वे क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर कॅपिटल गुड्स इंजिनीअरिंग क्षेत्रात गुंतवणूक करावी. आयआरएफसी शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी लॉन्ग टर्म दृष्टिकोन असेल तरच गुंतवणूक करावी. किंवा कमीत कमी 6 ते 12 महिन्यांसाठी शेअर होल्ड करावा. मात्र गुंतवणूकदारांनो हा शेअर 2 ते 2.5 वर्षांसाठी होल्ड केल्यास खूप चांगला परतावा मिळेल असं म्हटलं आहे.

कंपनीची ऑर्डरबुक खूप मजबूत

गौरांग शहा पुढे म्हणाले की, ‘भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी भारत सरकार मोठी गुंतवणूक करत आहे. त्यामुळे सरकारी रेल्वे कंपन्यांना मोठे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त होणार आहेत. तसेच या कंपनीची ऑर्डरबुक खूप मजबूत आहे. हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होतील तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम सरकारी कंपन्यांच्या आर्थिक निकालात सुद्धा दिसतील. गेल्या दोन वर्षात ३६५ टक्के आणि गेल्या तीन वर्षांत आयआरएफसीच्या शेअरने गुंतवणूकदारांना ५७० टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price Friday 20 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या