13 January 2025 11:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

IRFC Share Price | आता नाही थांबणार! IRFC शेअर 250 रुपयांच्या प्राईस लेव्हल क्रॉस करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स आज किंचित (NSE: IRFC) घसरले आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. 30 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 178.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयआरएफसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,33,468.86 कोटी रुपये आहे. (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प लिमिटेड कंपनी अंश)

मागील एका महिन्यात आयआरएफसी स्टॉक 5.9 टक्के घसरला आहे. आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने सूचीबद्ध झाल्यापासून गुंतवणुकदारांना 618.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. जानेवारी 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 24.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.41 टक्के घसरणीसह 177.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सची सर्वकालीन नीचांक किंमत पातळी 19.30 रुपये होती. तर सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 229 रुपये होती. आयआरएफसी कंपनीचे शेअर्स आपल्या नीचांक किंमत पातळीपासून 30 ऑगस्ट 2024 पर्यंत 825.6 टक्के वाढले आहेत. आयआरएफसी कंपनीने गुंतवणुकदारांना चांगला लाभांश देखील दिला आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये या कंपनीने 7 रुपये लाभांश वाटप केला होते. मागील 12 महिन्यांत या कंपनीने प्रति शेअर 2.20 रुपये लाभांश वाटप केला होता. या कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 1.23 टक्के आहे.

मागील एका वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 258.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आर्थिक वर्षात या स्टॉकचा इक्विटी ऑन रिटर्न 13.03 टक्के होता. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी आयआरएफसी स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉक 250 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

आयआरएफसी स्टॉक 179 रुपये या आपल्या दीर्घकालीन ट्रेंडलाइन सपोर्ट लेव्हलच्या जवळ आहे. तज्ञांनी गुंतवणुकदारांना आयआरएफसी स्टॉक खरेदी करताना 164 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आयआरएफसी कंपनीची स्थापना 12 डिसेंबर 1986 रोजी झाली होती. ही कंपनी भारतीय रेल्वेची समर्पित वित्तपुरवठा शाखा म्हणून व्यवसाय करते. IRFC ही एक शेड्यूल ‘A’ दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे.

News Title | IRFC Share Price NSE: IRFC 02 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x