18 November 2024 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने मिळेल परतावा! IRFC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मोठी कमाई होणार

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला (NSE: IRFC) मिळाली आहे. भारतीय रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि रेल विकास निगम कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल (NSE:IRFC) केले आहे. आयआरएफसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,35,429.14 कोटी रुपये आहे. बाजार भांडवलाच्या दृष्टीने ही भारतातील सर्वात मोठी रेल्वे कंपनी आहे. (आयआरएफसी कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 229.05 रुपये होती. तर नीचांक किंमत 46.38 रुपये होती. आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.056 टक्के वाढीसह 180.01 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयआरएफसी कंपनीचे किंमत-ते-इक्विटी गुणोत्तर 36.51x आहे. तर इक्विटीवरील परतावा प्रमाण 13.11 टक्के आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 79.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 277.44 टक्के वाढली आहे. जून तिमाहीत आयआरएफसी कंपनीने 6765.6 कोटी रुपये नफा कमावला होता. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 6,673.8 कोटी रुपये नफा कमावला होता. जून तिमाहीत आयआरएफसी कंपनीचा PAT 1,551.2 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,576.8 कोटी रुपये PAT नोंदवला होता.

आयआरएफसी कंपनीमध्ये प्रमोटरची शेअर होल्डिंग 86.36 टक्के आहे. तर म्युच्युअल फंडाची होल्डिंग 0.37 टक्केवरून वाढून 0.55 टक्केवर पोहोचली आहे. जून तिमाहीत आयआरएफसी कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 0.70 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. नोव्हेंबर 2023 मध्ये या कंपनीने प्रति शेअर 0.80 रुपये अंतरिम लाभांश वाटप केला होता. आयआरएफसी कंपनी 22 ऑगस्ट रोजी एक्स-डिव्हिडंड म्हणून व्यवहार करणार आहे.

प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉकमध्ये 178 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. हा स्टॉक 183 रुपये या 50 दिवसांच्या EMA पातळीच्या पुढे जाण्याची तयारी करत आहे. आयआरएफसी स्टॉकचा आरएसआय ओव्हरबॉट झोनमधून सकारात्मक ट्रेंड रिव्हर्सलसह आकर्षक झोनमध्ये पोहोचला आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 164 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 230-250 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

News Title | IRFC Share Price NSE: IRFC 21 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x