18 November 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

IRFC Share Price | IRFC शेअर दैनंदिन चार्टवर ब्रेकआउटसह ओव्हरबॉट, शेअर्सबाबत तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

IRFC Share Price

IRFC Share Price | IRFC म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम उसळी पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC स्टॉक 6.06 टक्क्यांच्या वाढीसह 109.30 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आणि दिवसा अखेर हा स्टॉक 106.87 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे.

मागील एका वर्षात IRFC कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 238 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 365 टक्क्यांनी वाढली आहे. IRFC या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,39,663.12 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी IRFC स्टॉक 6.27 टक्के वाढीसह 113.55 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

शेअर बाजारातील तज्ञाच्या मते, IRFC कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 126 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आयडीबीआय कॅपिटल फर्मच्या तज्ञांनी IRFC स्टॉकची टारगेट प्राइस 120-125 रुपये निश्चित केली आहे. प्रभुदास लीलाधर फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर 100 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून 104 रुपये किमतीच्या आसपास स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते हा स्टॉक पुढील काही दिवसात 126 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

Tips 2 Trades फर्मच्या तज्ञांच्या मते, IRFC स्टॉक दैनंदिन चार्टवर 114 रुपये पुढील ब्रेकआउटसह ओव्हरबॉट देखील झाले आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी सध्याच्या किमतीवर नफा बुक केला पाहिजे. कारण हा स्टॉक 80 पर्यंत घसरू शकतो. डीआरएस फिनव्हेस्ट फर्मच्या तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसात IRFC स्टॉक 120 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मात्र तज्ञांनी स्टॉक खरेदी करताना त्यात 103 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

आर्थिक वर्ष 2024-31 या काळात भारत सरकारने रेल्वे क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे . यासारख्या अनेक निर्णयांमुळे भारतातील रेल्वे क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे आगमन होणार आहे. त्यामुळे रेल्वे कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. आणि त्यांच्या शेअर्समध्ये देखील वाढ होऊ शकते. वंदे भारत ट्रेन आणि रेल्वे डबे यांतील सेवांमध्ये सुधारणा झाल्यामुळे रेल्वे कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहे.

सप्टेंबर 2023 तिमाहीच्या डेटानुसार IRFC कंपनीचे 86.36 टक्के भाग भांडवल प्रवर्तकांनी होल्ड केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 13.64 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. IRFC कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीत 1549 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1714 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत कंपनीने ऑपरेशन्समधून 6766 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाही काळात कंपनीने 5809 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 12 January 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x