18 November 2024 2:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL
x

IRFC Share Price | IRFC शेअर ना ओव्हरबॉट झोनमध्ये ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांकडून पुढील मजबूत टार्गेट प्राईस जाहीर

IRFC Share Price

IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आयआरएफसी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र आता या कंपनीचे शेअर्स पुन्हा तेजीत वाढत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 152.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

त्यापूर्वी अवघ्या तीन ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 18.12 टक्क्यांनी घसरले होते. या काळात शेअर्सची किंमत 162.45 रुपये किमतीवरून 133 रुपये किमतीवर पोहचली होती. आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.65 टक्के वाढीसह 154.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

23 जानेवारी 2024 रोजी आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 192.80 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 25.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आयआरएफसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.94 लाख कोटी रुपये आहे. टेक्निकल चार्टनुसार आयआरएफसी स्टॉक सध्या ना ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत आहे, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत आहे. आयआरएफसी स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स सध्या 42.3 अंकावर आहे.

आयआरएफसी स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवसांच्या सरासरी किमतीच्या खाली मात्र 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूविंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एका वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक 192 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील सहा महिन्यांत आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 192.63 टक्के नफा कमावून दिला आहे. आयआरएफसी स्टॉकचा PE गुणोत्तर 32.1 आहे, जो त्यांच्या 15.59 या सेक्टरल पीई पेक्षा अधिक आहे.

प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉकमधे 192 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. तर 130 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट आहे. तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉक पुढील काही दिवसात 175 रुपये ते 187 रुपये किमतीवर जाऊ शकतो. टिप्स 2 ट्रेड्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉकमध्ये 153 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक या किमतीच्या वर टिकला तर अल्पावधीत शेअर 180 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

डिसेंबर 2023 तिमाहीत आयआरएफसी कंपनीने 1,604 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 1.7 टक्के घट पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत आयआरएफसी कंपनीने 1,633 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या महसूल संकलनात 8 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत आयआरएफसी कंपनीने 6,218 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर या तिमाहीत कंपनीने 6,742 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 14 February 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x