22 February 2025 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मजबूत खरेदी पाहायला मिळाली. शुक्रवारच्या व्यवहारात आयआरएफसी स्टॉक 5.19 टक्क्यांच्या वाढीसह 158.05 रुपये किमतीवर पोहोचला होता. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. ( आयआरएफसी कंपनी अंश )

मागील सहा महिन्यांत आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 402 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजीच्या व्यवहारात आयआरएफसी स्टॉक 5.02 टक्के वाढीसह 157.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

शुक्रवारी आयआरएफसी स्टॉकची ट्रेडिंग व्हॉल्युम 1.58 कोटी शेअर्स होती. या कंपनीच्या शेअर्सची मागील दोन आठवड्यांची सरासरी ट्रेडिंग व्हॉल्युम 42.93 लाख शेअर्स होती. आयआरएफसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,06,547.74 कोटी रुपये आहे.

आयआरएफसी स्टॉकमध्ये 152-150 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 160 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर आणखी वाढू शकतो. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी आयआरएफसी स्टॉकवर 175 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 152 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉकमध्ये 150 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर 160 रुपये किमतीवर प्रतिरोध पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 160 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर अल्पावधीत 170 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉक पुढील एका महिन्याची ट्रेडिंग रेंज 145 रुपये ते 175 रुपये दरम्यान असेल.

आयआरएफसी स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. आयआरएफसी स्टॉकचा RSI 51.58 अंकावर आहे. मार्च 2024 पर्यंत आयआरएफसी कंपनीच्या प्रवर्तकांनी या कंपनीचे 86.36 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आयआरएफसी ही सरकारी कंपनी नवरत्न दर्जा प्राप्त असलेली कंपनी आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 27 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x