30 June 2024 7:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 01 जुलै 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या New Bikes 2024 | खुशखबर! पहिल्या CNG बाईक'सह 'या' 4 नव्या बाईक्स लाँचसाठी सज्ज, तारीख आणि फीचर्स नोट करा Numerology Horoscope | 01 जुलै 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Smart Investment | पगारदारांनो! या सरकारी योजनेतून तुमची पत्नी 5 लाखांपेक्षा जास्त कमाई करू शकते, संधी सोडू नका Home Loan EMI | तुम्ही गृह कर्जाच्या EMI ने कंटाळला आहात? असा कमी करा EMI चा भार 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी खुशखबर! प्रलंबित 18 महिन्यांचा DA एरियर मिळणार IRCTC Railway Ticket | यात्री कृपया ध्यान दें! जनरल तिकिट आणि स्लीपर कोच संदर्भात रेल्वेने नियम बदलला, प्रवाशांना फायदा
x

IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर देणार ब्रेकआऊट, पुढची टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूकदार खुश होणार

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.3 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 200 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 32 रुपये होती. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )

मागील 6 महिन्यांत आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सची किंमत 97 रुपये या नीचांक किमतीवरून 80 टक्के वाढली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 32.35 रुपयेवरून 443 टक्क्यांनी वाढली आहे. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.54 टक्के वाढीसह 175.98 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

29 जानेवारी 2021 रोजी आयआरएफसी स्टॉक 24.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या किमतीवरून स्टॉक 609 टक्के वाढला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक आणखी वाढू शकतो. या कंपनीचा आयपीओ 26 रुपये प्रति शेअर किमतीवर लाँच झाला होता. या किमतीवरून शेअर 7 पट वाढला आहे.

4 जून रोजी सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, त्या दिवशी आयआरएफसी स्टॉक 164 रुपये किमतीवर पोहचला होता. तज्ञांच्या मते, जर आयआरएफसी स्टॉक 160 रुपये किमतीच्या वर टिकला तर शेअर 200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी गुंतवणूक करताना शेअरमध्ये 159 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, जर आयआरएफसी स्टॉकने 200 रुपये किमतीवर ब्रेकआऊट दिला तर शेअर 235 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आयआरएफसी ही सरकारी कंपनी भारतीय रेल्वेच्या पायाभूत प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 27 June 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x