15 January 2025 6:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी ग्लोबल सकारात्मक संकेतांमुळे स्टॉक मार्केट तेजी सह बंद झाला होता. मंगळवारी सेन्सेक्स ५०० अंकांच्या तेजीसह आणि निफ्टी २०० अंकांच्या तेजीसह बंद झाला होता. दरम्यान, जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.

आयआरएफसी शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी आयआरएफसी शेअर 6.16 टक्क्यांनी वाढून 136.35 रुपयांवर पोहोचला होता. आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 229 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 116.65 रुपये होती. आयआरएफसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,77,199 कोटी रुपये आहे.

आयआरएफसी कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला

आयआरएफसी कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील बनहरडीह कोळसा ब्लॉकच्या विकासासाठी 3,167 कोटी रुपये वित्तपुरवठा करणार आहे. आयआरएफसी कंपनी या टेंडरसाठी सर्वात कमी बोली लावणारी (एल 1) कंपनी बनली आहे.

पतरातुन इलेक्ट्रिक जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड हा एनटीपीसी लिमिटेड आणि झारखंड वीज वितरण निगम लिमिटेड यांच्यामधील संयुक्त उपक्रम आहे. या संयुक्त उपक्रमाद्वारे हा प्रकल्प सुरू केला जात आहे.

आयआरएफसी शेअरबाबत तज्ज्ञांनी काय म्हटले

जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ तेजस शहा आयआरएफसी शेअरबाबत सल्ला देताना म्हणाले की, ‘आयआरएफसी शेअर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत असला तरी लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून शेअरला १३०-१३२ रुपयाच्या आसपास सपोर्ट आहे.

आयआरएफसी शेअर १३० रुपयांच्या आसपास खरेदी करावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. पुढे तेजस शहा म्हणाले की, ‘जर शेअर 130 रुपयाच्या खाली घसरला तर तर पुढचा सपोर्ट 116 रुपयांच्या आसपास आहे. जर गुंतवणूकदार लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करत असतील तर ते 130 रुपयांच्या आसपास शेअर्स खरेदी करू शकतात.

आयआरएफसी शेअरने किती परतावा दिला

गेल्या ५ दिवसात आयआरएफसी शेअर 4.78 टक्क्यांनी घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 14.21 टक्क्यांनी घसरला आहे. मागील ६ महिन्यात आयआरएफसी शेअर 36.97 टक्क्यांनी घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 4.80% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरएफसी शेअरने 449.80% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर हा शेअर 10.22% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price Tuesday 14 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x