22 November 2024 10:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

IRFC Vs AVG Logistics Share | रेल्वे सेवा देणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत, वार्षिक 189 टक्के परतावा मिळतोय, ऑर्डरबुक मजबूत

IRFC Vs AVG Logistics Share

IRFC Vs AVG Logistics Share | एवीजी लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 323.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

वास्तविक एवीजी लॉजिस्टिक्स कंपनीसोबत भारतीय रेल्वेने पार्सल कार्गो एक्सप्रेस ट्रेन भाडेतत्त्वावर देण्यासाठी 150 कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे. बेंगळुरू ते पंजाबमधील लुधियानाला जोडणारी ही विशेष ट्रेन पुढील सहा वर्षांत दर आठवड्याला एक फेरी पूर्ण करेल. या प्रवासाचा कालावधी 72 तास असेल. आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी एवीजी लॉजिस्टिक्स स्टॉक 1.63 टक्के घसरणीसह 338.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एवीजी लॉजिस्टिक्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, या नवीन करारातून कंपनीच्या कमाईमध्ये 150 कोटी रुपयेची भर पडणार आहे. मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्प कंपनीच्या आर्थिक कामगिरीमध्ये आणखी सुधारणा करतील आणि कंपनीच्या व्यवसाय वाढीला अधिक प्रोत्साहन देतील अशी भावना कंपनीच्या संचालकांनी व्यक्त केली आहे. कंपनीने म्हंटले आहे की, लुधियाना स्टेशन या नवीन रेल्वे नेटवर्कमध्ये एक महत्त्वपूर्ण बिंदू आहे, जो मुख्य कापड बाजार आणि सायकल उत्पादनासाठी ओळखला जातो.

एवीजी लॉजिस्टिक्स कंपनीच्या भारतात 50 पेक्षा जास्त स्वयंचलित शाखा कार्यरत आहेत. ही कंपनी रेल्वे वाहतूक, रीफर्स, कोल्ड चेन आणि वेअरहाउसिंग संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. मागील एका वर्षात एवीजी लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 171.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 189.53 टक्के वाढली आहे.

या काळात एवीजी लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 118 रुपयेवरून वाढून 323.85 रुपये किमतीवर पोहोचली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 126 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs AVG Logistics Share NSE 06 December 2023.

हॅशटॅग्स

IRFC Vs AVG Logistics Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x