30 January 2025 6:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झालाय, मग इथे लक्ष द्या, तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होईल EPFO Passbook | पगारदारांच्या खात्यात EPF चे 1.07 कोटी रुपये जमा होणार, महिना 25,000 रुपये नोकरदारांचाही फायदा होणार 5G Mobile Under 10000 | जबरदस्त 5G स्मार्टफोनसाठी खास ऑफर, खिशाला परवडतील 'हे' स्वस्त 5G स्मार्टफोन्स Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 38 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RPOWER Loan on Aadhar Card | आधार कार्डावरून मिळवता येईल 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज, 'या' योजनेबद्दल ठाऊक आहे का RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
x

IRFC Vs Ircon Share Price | रेल्वे संबंधित शेअर्स तेजीत, तज्ज्ञांनी जाहीर केली शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस, किती फायदा मिळणार?

IRFC Vs Ircon Share Price

IRFC Vs Ircon Share Price | आज भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. सध्या भारतात दिवाळी आणि सणासुदीचा काळ सुरू होणार आहे. अशा काळात कमाई करण्यासाठी गुंतवणूकदार दर्जेदार शेअर्स शोधत आहेत. म्हणून तज्ञांनी गुंतवणूकदारांना इरकॉन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

IRCON इंटरनॅशनल ही कंपनी भारतीय रेल्वेसाठी अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्याचे काम करते. ही कंपनी भारतीय रेल्वेसाठी इमारत, महामार्ग, पूल, विद्युत प्रकल्प बनवण्याचे काम करते. IRCON इंटरनॅशनल कंपनी जगभरातील 25 देशांमध्ये आपल्या सेवा प्रदान करते. या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 32500 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी IRCON इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 3.09 टक्के वाढीसह 146.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुकताच IRCON इंटरनॅशनल कंपनीने अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केल्याची घोषणा केली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी IRCON इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरवर 160 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आणि 135 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. ही लक्ष्य किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 13 टक्के अधिक आहे.

मागील तीन महिन्यांत IRCON इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरची किंमत 50 टक्के वाढली आहे. 2023 वर्षात IRCON इंटरनॅशनल स्टॉक आतापर्यंत 140 टक्के, आणि मागील एका वर्षात 200 टक्के वाढला आहे. मागील तीन वर्षांत IRCON इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 280 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच भारत सरकारने रेल्वचा एक मेगा प्लॅन जाहीर केला होता, ज्यात सरकार दरवर्षी 2 लाख कोटीपेक्षा अधिक रक्कम खर्च करणार आहे. याचा फायदा IRCON इंटरनॅशनल यासारख्या कंपन्यांना होणार आहे.

शेअर बाजारातील तज्ज्ञांनी कॅपॅसिटी इन्फ्रा या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.24 टक्के वाढीसह 215.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. कॅपॅसिटी इन्फ्रा ही कंपनी मुख्यतः उंच इमारतींचे बांधकाम करण्याचा व्यवसाय करते.

तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 225 रुपये लक्ष्य किंमत आणि 205 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. कॅपॅसिटी इन्फ्रा कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत 248 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 108 रुपये होती. 2023 या यावर्षात कॅपॅसिटी इन्फ्रा स्टॉक 40 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs Ircon Share Price NSE 06 November 2023.

हॅशटॅग्स

IRFC Vs Ircon Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x