14 January 2025 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

IRFC Vs RVNL Share Price | मल्टिबॅगर रेल्वे शेअर्स फोकसमध्ये, 30 ते 40 टक्के घसरले, आता BUY करावा का - Marathi News

Highlights:

  • IRFC Vs RVNL Share Price
  • शेअर्स उच्चांकी पातळीवरून घसरले
  • मल्टिबॅगर IRFC शेअर घसरतोय
  • मल्टिबॅगर RVNL शेअर
  • इरकॉन इंटरनॅशनल शेअर
IRFC Vs RVNL Share Price

IRFC Vs RVNL Share Price | या वर्षात मोठा परतावा देणाऱ्या रेल्वे कंपन्यांच्या शेअर्सवर सातत्याने विक्रीचा दबाव दिसून येत आहे. मात्र, जुलै महिन्यापासून रेल्वेच्या अनेक मल्टिबॅगर शेअर्समध्ये करेक्शन पाहायला मिळत आहे.

शेअर्स उच्चांकी पातळीवरून घसरले
दरम्यान, रेल्वे कंपन्यांचे अनेक शेअर्स उच्चांकी पातळीवरून 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घसरल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. तसेच सध्याच्या जागतिक घडामोडींमुळे या शेअर्समध्ये अजून दबाव वाढल्याने गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे या रेल्वे शेअर्सच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचे आहे असं तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मल्टिबॅगर IRFC शेअर घसरतोय
स्टॉक मार्केटमधील रेल्वे संबंधित सर्वाधिक चर्चेत असलेला शेअर म्हणजे IRFC. हा शेअर मागील 13 पैकी 11 ट्रेडिंग सेशनमध्ये सातत्याने घसरल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. दोन महिन्यापूर्वी म्हणजे 15 जुलै 2024 रोजी IRFC शेअरने 229 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र त्या पातळीवरून हा शेअर जवळपास 33 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच मागील 3-4 दिवसांपासून सध्याच्या जागतिक घडामोडींमुळे हा शेअर अजून दबावाखाली येईल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे मागील 1 वर्षात या रेल्वे शेअरने 100% परतावा दिला आहे आहे. त्यामुळे काही तज्ज्ञ ही खरेदीची योग्य संधी आहे असा सल्ला देखील देतं आहेत. सोमवार दिनांक 07 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.90 टक्के घसरून 146.14 रुपयांवर ट्रेड करत आहे.

मल्टिबॅगर RVNL शेअर
IRFC शेअर प्रमाणे RVNL शेअर प्राईसच्या बाबतीत देखील तेच घडत आहे. कारण RVNL कंपनीचा शेअर 15 जुलै 2024 रोजीच्या 647 रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवरून 21 टक्क्यांनी घसरला आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. दरम्यान, RVNL कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाल्यांनतरही शेअर प्राईसमध्ये 13 पैकी 10 ट्रेडिंग सत्रांमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ही संधी समजून शेअर BUY करावा की Sell याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळतंय. सोमवार दिनांक 07 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 6.19 टक्के घसरून 462.85 रुपयांवर ट्रेड करत आहे.

इरकॉन इंटरनॅशनल शेअर
रेल्वे संबधित इरकॉन इंटरनॅशनल कंपनीचा शेअर देखील मागील 13 पैकी 10 सत्रात घसरला आहे. या सरकारी इरकॉन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरने 15 जुलै रोजी 351 रुपये प्राईसचा उच्चांक गाठला होता. त्या पातळीवरून इरकॉन इंटरनॅशनल कंपनीचा शेअर जवळपास 37 टक्क्यांनी घसरला आहे. सोमवार दिनांक 07 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 4.14 टक्के घसरून 208.37 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Vs RVNL Share Price 07 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Vs RVNL Share price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x