20 January 2025 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY करावा की SELL - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट तेजीत, 5 दिवसात 25 टक्के कमाई, पुढेही मालामाल करणार - NSE: IDEA TTML Share Price | 79 रुपयाचा TTML शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 3100% परतावा दिला - NSE: TTML Zero Tax on Salary | महिना पगार 1 लाख रुपये असेल तरी 1 रुपयाही इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही, 90% पगारदारांना माहित नाही Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा NHPC Share Price | 80 रुपयाचा एनएचपीसी शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

IT Notice to Sugar Factories | राज्यातल्या 60 कारखान्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा | केंद्र विरुद्ध सहकार क्षेत्र?

IT Notice to Sugar Factories

मुंबई, ०७ ऑक्टोबर | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांची संबंधित सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांवर प्राप्तिकर खात्याचे छापे पडण्याची चर्चा राज्यभर सुरू आहे पण सध्या फक्त काहीच कारखान्यांवर (IT Notice to Sugar Factories) कारवाई सुरू कायदेशीर कारवाई सुरू आहे प्रत्यक्षात एकूण 60 साखर कारखान्यांना प्राप्तीकर विभागाने नोटिसा पाठवले आहेत या कारखान्यांकडे प्राप्तिकर विभागाची सात हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

IT Notice to Sugar Factories. Discussions are going on across the state about the raids of income tax department on the relatives of DCM Ajit Pawar and private sugar factories but at present only a few factories are being prosecuted. In fact, the Income Tax Department has sent notices to a total of 60 sugar factories :

अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाची कारवाई सुरु आहे. दौंड शुगर ,आंबलिक शुगर , जरंडेश्वर साखर ,पुष्पदंतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र पोलिसांना या कारवाईची कल्पना न देता केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना घेऊन प्राप्तीकर विभागाने छाप्याची कारवाई केल्याचे समजते.

हे सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. राज्य सरकारच्या पोलिस यंत्रणेला कुठलीही कल्पना न देता सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू आहे. केंद्रीय यंत्रणांनी सकाळी सात वाजल्यापासून धाडीची कारवाई सुरू केली आहे. जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली. तर अंबालिका साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जंगल वाघ यांच्या काटावाडीतील घरी तपास यंत्रणा पोहोचल्या आहेत. जंगल वाघ हे काटावाडीतील अजित पवारांच्या घराजवळच राहतात.

अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका कारखाना अजित पवारांच्या खाजगी मालकीचा आहे. त्याचबरोबर बारामतीतील डायनॅमिक्स डेअरीवर देखील छापा सुरु आहे. शरद पवारांशी संबंधित गोयंका कुटुंबीयाची आहे. या सर्व पवारांशी संबंधित संस्था असल्याची माहिती आहे.

अजित पवारांशी संबंधित ज्या अनेक साखर कारखान्यांवर छापे सुरु आहेत त्यातील एक आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दौंड शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड हा खाजगी साखर कारखाना. या कारखान्याचे संचालक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे. जगदाळेंनी त्यांना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसीठी बोलावल्याचं सांगितलंय. मात्र अजित पवारांचा या कारखान्याशी कोणताही थेट संबंध नसल्याचा दावा केला आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखाने आधीच अडचणीत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील 60 हून अधिक सहकारी साखर कारखान्यांना प्राप्तिकर खात्याने 7 हजार कोटी कर भरण्यासाठी नोटीसा पाठवल्या आहेत. या सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या निर्धारित दरापेक्षा ऊस खरेदीसाठी दिलेली अधिकची रक्कम कारखान्याचा नफा आहे असेकरसूत्र लावून हा कर आकारण्यात आलाय. दुसरीकडे खासगी कारखान्यांना मात्र हे सूत्र न लावता त्याचा समावेश ऊस खरेदी खर्च सदरात केला आहे. शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून सहकारी तत्त्वावरील केलेल्या चांगल्या प्रयत्नांना प्राप्तिकर खात्याच्या या निर्णयामुळे फटका बसला आहे असा राष्ट्रवादीने दावा केला आहे. हा मुद्दा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यापर्यंत नेला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: IT Notice to Sugar Factories in Maharashtra state.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x