ITC Share Price | आयटीसी शेअर बाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, डिव्हीडंड तपशील जाणून गुंतवणूकीचा विचार करा
Highlights:
- ITC Share Price
- लाभांश वाटप करण्याची घोषणा
- आयटीसी कंपनी मार्च तिमाही निकाल
- स्टॉकबाबत तज्ञांचे मत
ITC Share Price | भारतातील FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी ITC च्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयटीसी कंपनीचे शेअर्स 0.74 टक्क्यांच्या वाढीसह 442.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयटीसी कंपनीच्या शेअरने नुकताच 452 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळी स्पर्श केला होता. मागील एका महिन्यात ITC कंपनीने FY23 साठी 6.75 रुपये अंतिम लाभांश वाटप केला आहे.
लाभांश वाटप करण्याची घोषणा
आयटीसी कंपनीने या वर्षासाठी प्रति शेअर 2.75 रुपये विशेष लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील 5 महिन्यांत आयटीसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी आयटीसी कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के घसरणीसह 442.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आयटीसी कंपनीने आपल्या शेअर धारकांना एकूण 15.50 रुपये लाभांश वाटप केला होता. यापूर्वी आयटीसी कंपनीने 3 फेब्रुवारी रोजी प्रति शेअर 6 रुपये अंतरिम लाभांश वाटप केला होता. अशा प्रकारे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आयटीसी कंपनीने एकूण 15.50 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप केला होता. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आयटीसी कंपनीने एकूण 19,255.02 कोटी रुपये लाभांश म्हणून वितरित केले होते. ज्यामध्ये 7,448.41 कोटी रुपये अंतरिम लाभांश म्हणून वाटप करण्यात आले होते.
आयटीसी कंपनी मार्च तिमाही निकाल
आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत आयटीसी कंपनीच्या निव्वळ नफ्यात 21 टक्क्यांची वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने तब्बल 5,087 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तंबाखू उत्पाद तसेच इतर उपभोग्य वस्तूंच्या मागणीमुळे कंपनीच्या निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे.
स्टॉकबाबत तज्ञांचे मत
ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरच्या तज्ञांनी या स्टॉकमध्ये जोरदार तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांनी आयटीसी स्टॉकमध्ये 480-490 रुपये लक्ष्य किमतीसह आणखी चढ-उतार होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पुढील काळात आयटीसी स्टॉक 420-425 रुपये किमतीच्या दरम्यान ट्रेड करु शकतो.
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांनी आयटीसी स्टॉकवर 475 रुपये लक्ष किंमत जाहीर करून 435 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आता गुंतवणूकदार 445-450 रुपये किमतीच्या दरम्यान हा स्टॉक खरेदी करू शकतात. मागील 5 महिन्यांत आयटीसी कंपनीच्या स्टॉकने लोकांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | ITC Share Price today on 05 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार