
ITC Share Price | ‘आयटीसी लिमीटेड’ या भारतातील प्रसिद्ध एफएमसीजी कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘आयटीसी लिमीटेड’ कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 432.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवारी हा स्टॉक 427.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 8 मे 2023 रोजी ‘आयटीसी लिमीटेड’ कंपनीचे शेअर्स 433.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 420.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंपनीबद्दल मूलभूत माहिती :
ITC कंपनी लवकरच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, ITC कंपनीचे तिमाही निकाल मजबूत असतील. ही कंपनी मुख्यतः तंबाखू, हॉटेल व्यवसाय, FMCG प्रोडक्ट्स, कृषी इत्यादी सर्व श्रेणींमध्ये व्यवसाय करते. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर आयटीसी कंपनीचे शेअर्स बुल ट्रेंडमध्ये वाढू शकतात.
डिमर्जर होण्याची शक्यता :
एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ज्ञांच्या मते, आयटीसी कंपनीला तंबाखू व्यवसायात प्रचंड वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर हॉटेल व्यवसायातही कंपनी चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहे. शेअर बाजाराला त्याच्या ITC व्यवस्थापनाकडून डिमर्जर योजनांबाबत काही घोषणेची अपेक्षा आहे. जर डिमर्जर संदर्भात घोषणा झाली तर, ITC कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळू शकते. म्हणून तज्ञांनी ‘आयटीसी लिमीटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
शेअरची लक्ष किंमत :
चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी ITC कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन स्टॉक 450 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 418 प्रति शेअर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान ICICI डायरेक्ट रिसर्च फर्मने ITC कंपनीच्या मार्च 2023 तिमाही निकालांचा अंदाज अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, सिगारेट व्यवसायात कंपनी 15.9 टक्के मजबूत बाढ नोंदवू शकते. ITC कंपनीच्या महसुलात 6.3 टक्के वाढ होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त कंपनीच्या FMCG व्यवसायात देखील 19.1 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























