ITC Share Price | भरवशाचा शेअर! आयटीसी शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
ITC Share Price | आयटीसी कंपनीचे शेअर मागील काही महिन्यांपासून आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. तज्ञांच्या मते आता आयटीसी स्टॉक 500 रुपये किंमत ओलांडू शकतो. म्हणजेच सध्या किंमत पातळीच्या तुलनेत शेअरची किंमत आणखी 10 टक्के वाढू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. स्टॉकमधील वाढीचे संकेत पाहून तज्ञांनी गुंतवणूकदारांना स्टॉक खरेदी करून दीर्घकाळ होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी आयटीसी कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 493.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात प्रचंड घसरण पहायला मिळाली होती. तरी देखील आयटीसी स्टॉकमध्ये जोरदार खरेदी सुरू होती. दिवसा भराच्या व्यवहारात आयटीसी स्टॉक 497.70 रुपये किमतीवर पोहोचला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयटीसी कंपनीचे शेअर्स 492.15 रूपये किमतीवर क्लोज झाले होते.
आयटीसी ही कंपनी मुख्यतः सिगारेट व्यवसायाव्यतिरिक्त, हॉटेल, पेपर उत्पादने आणि FMCG व्यवसायात गुंतलेली दिग्गज कंपनी आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत कंपनी आपला हॉटेल व्यवसाय विलग करण्याची घोषणा करु शकते.
2021 या वर्षात सोशल मीडियावर आयटीसी कंपनीच्या शेअरचे मीम्स व्हायरल होत होते. कारण या स्टॉकमध्ये अजिबात उलाढाल होत नव्हती. आता हा स्टॉक मागील 15 महिन्यांत आउटपरफॉर्मर स्टॉक म्हणून नावारूपाला आला आहे. 25 फेब्रुवारी 2022 पासून आत्तापर्यंत आयटीसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात आयटीसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63.88 टक्के नफा कमावून दिला आहे.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी सध्याच्या किंमत पातळीवर आयटीसी स्टॉक खरेदी करावा. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते आयटीसी स्टॉक पुढील काळात जबरदस्त तेजी वाढू शकतो. म्हणून तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. दुसरीकडे, अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांनी आयटीसी शेअर 550 रुपये किमतीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | ITC Share Price today on 22 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल