18 November 2024 7:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN
x

ITD Cementation Share Price | मार्ग श्रीमंतीचा! ITD सिमेंटेशन शेअरने 1 दिवसात 14% परतावा दिला, परतावा इतिहास पाहून फायदा उचला

ITD Cementation Share Price

ITD Cementation Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ITD सिमेंटेशन इंडिया कंपनीचे शेअर 14 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. एका दिवसात या कंपनीच्या शेअरने अफाट तेजी नोंदवली आहे. शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी ITD सिमेंटेशन इंडिया कंपनीचे शेअर्स 14.66 टक्के वाढीसह 249.40 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला 3290 रुपये मूल्याची एक वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी ITD सिमेंटेशन इंडिया कंपनीचे शेअर्स 7.89 टक्के वाढीसह 234.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

स्टॉक वाढीचे कारण

ITD सिमेंटेशन इंडिया कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, ITD सिमेंटेशन इंडिया कंपनीला 3290 कोटी रुपये मूल्याचे नवीन काम मिळाले आहे. 31 ऑगस्ट 2023 रोजी आयटीडी सिमेंटेशन इंडिया कंपनीने अद्याप वर्क ऑर्डरचे संपूर्ण तपशील जाहीर केले नाहीये. मात्र या वर्क ऑर्डरमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा ITD सिमेंटेशन इंडिया कंपनीवरील विश्वास अनेक पटींनी वाढला आहे.

शेअरची कामगिरी

मागील एका महिन्यात ITD सिमेंटेशन इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 143 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 249.40 रुपये प्रति शेअर होती.

52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 93.75 रुपये होती. 28 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने केलेल्या घोषणेनुसार पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 0.75 रुपये लाभांश वाटप केले जाणार आहे. मात्र कंपनीने अद्याप लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड डेट अजून जाहीर केली नाहीये.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ITD Cementation Share Price today on 02 September 2023.

हॅशटॅग्स

ITD Cementation Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x