18 April 2025 1:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

ITR Filing | 22 टक्के करदाते मुदतीपूर्वी ITR दाखल करू शकणार नाहीत, तक्रारींवर आयकर विभागाने दिले असं उत्तर

ITR Filing

ITR Filing | देशातील करदात्यांकडे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. एका सर्वेक्षण अहवालानुसार, २२ टक्के करदात्यांनी ३१ जुलैच्या मुदतीपूर्वी आयटीआर दाखल करता येणार नाही, असे म्हटले आहे. मात्र, १० टक्के लोकांनी इन्कम टॅक्सच्या ई-पोर्टलवर अडचणी येत असल्याची तक्रार केली आहे. यावर आयकर अधिकाऱ्यांनी कोणतीही अडचण तात्काळ दूर करून त्यासाठी वॉर रूम तयार करण्यात आल्याचं सांगितलं आहे.

२७ जुलै रोजी सर्वेक्षण :
लोकल सर्कल संस्थेने देशातील ३०६ जिल्ह्यांतील पुरुष आणि महिला करदात्यांकडून आयटीआर दाखल करण्यासाठी २७ जुलै रोजी सर्वेक्षण केले होते, ज्याला ११,००० प्रतिसाद मिळाला. या सर्वेक्षणात 69 टक्के पुरुष आणि 31 टक्के महिलांनी सहभाग घेतला होता. सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, 59 टक्के लोकांनी सांगितले की त्यांनी आधीच आयटीआर दाखल केला आहे.

अद्याप आयटीआर दाखल केलेला नाही :
सर्वेक्षणानुसार, २२ टक्के करदात्यांनी अद्याप आयटीआर दाखल केलेला नाही आणि ते मुदतीपर्यंत भरण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले. आकडेवारीनुसार, त्यापैकी ९ टक्के लोकांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांना ३१ जुलैच्या अंतिम मुदतीपर्यंत आयटीआर दाखल करता येणार नाही. मात्र, मुदतीपर्यंत अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करायचा असल्याचे १३ टक्के जणांनी सांगितले.

आयटीआर भरताना ई-पोर्टलवर अडचणी :
या सर्वेक्षणानुसार, १० टक्के करदात्यांनी आयटीआर भरताना ई-पोर्टलवर अडचणी येत असल्याचे सांगितले. ज्यामुळे तो भरू शकला नाही, पण तो पुन्हा प्रयत्न करतोय. ई-पोर्टलवरील अडचणीच्या तक्रारीवर आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणतीही समस्या लक्षात येताच ती तातडीने दूर केली जात आहे. त्यासाठी वॉर रूम तयार करण्यात आली आहे.

फॉर्म 26 एएसमध्ये तांत्रिक अडचणी :
आयकर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉर्म 26एएसमध्ये त्रास होत असल्याची तक्रार आली होती, ती तात्काळ दुरुस्त करण्यात आली. विभाग सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारींवर लक्ष ठेवून त्या लवकरात लवकर दुरुस्त करत आहे. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, 29 जुलैच्या दुपारपर्यंत 4 कोटींहून अधिक करदात्यांनी ई-पोर्टलच्या माध्यमातून आयटीआर दाखल केले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: ITR Filing 22 percent taxpayers not sure to file ITR on deadline 31 July see details 29 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#ITR Filing(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या