15 January 2025 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

ITR Filing Update | इन्कम टॅक्स रिटर्न भरताना 80C अंतर्गत दावा करताना तुम्ही या 5 चुका करू नका

ITR Filing Update

ITR Filing Update | आयटीआर भरण्यापूर्वी करदात्यांनी आपले उत्पन्न, गुंतवणूक आणि बचतीचा हिशेब करणे आवश्यक आहे. करदात्यांना कर वाचविण्यासाठी ८० सी हे प्राप्तिकर कायद्यातील सर्वात लोकप्रिय आणि पसंतीचे कलम आहे. आयकर कायद्याच्या कलम ‘८० सी’खाली करदात्यांना त्यांच्या काही खर्चावर आणि गुंतवणुकीवर करसवलतीचा लाभ मिळतो. जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे योग्य नियोजन केले तर तुम्ही वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीचा दावा करू शकता. अशावेळी त्याअंतर्गत दावा करताना करदात्यांनी पाच चुका टाळाव्यात.

लॉक-इन कालावधी लक्षात ठेवा :
प्राप्तिकराच्या कलम ‘८० सी’खाली काही वजावटी लॉक-इन कालावधीत येतात. एफडीचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो आणि इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीमचा लॉक-इन पीरियड 3 वर्षांचा असतो. करदात्याने लॉक-इन कालावधीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या आर्थिक वर्षासाठी करदात्याचे उत्पन्न म्हणून त्या उत्पन्नावर कर आकारला जातो.

शिकवणी किंवा शाळेची फी मोजण्याची खात्री करा :
जर करदात्याने शाळा किंवा शिक्षण शुल्कासाठी वजावटीचा दावा केला असेल तर त्याने प्रथम काही तरतुदी समजून घेतल्या पाहिजेत. जास्तीत जास्त दोन मुलांच्या पूर्णवेळ शिक्षणासाठी भरलेल्या फीवर करदाता दावा करू शकतो. संपूर्ण फीच्या केवळ शिक्षण शुल्काच्या भागाचा दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे दावा करण्यापूर्वी शुल्क खर्चाची मोजणी करावी.

एंडोवमेंट योजनांमध्ये जास्त गुंतवणूक करणे टाळा :
करबचत आणि गुंतवणुकीसाठी एंडोमेंट योजना चांगल्या आहेत. मात्र त्यात कमाईचा मोठा हिस्सा गुंतवल्यास चांगला परतावा मिळणार नाही. त्यामुळे अधिक बचत करण्यासाठी ज्या टर्म प्लॅन्सवर सूट देण्यात आली आहे, अशा योजनांमध्ये गुंतवणूक करा.

गृहकर्जाची परतफेड :
आयकरदाते ८०सी अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या गृहकर्जाच्या परतफेडीचा दावा करू शकतात, परंतु हे समजून घेणे आवश्यक आहे की वैयक्तिक कर्जाची मूळ रक्कम (मित्र आणि नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज) ८० सी अंतर्गत समाविष्ट नाही. दाव्यासाठी बँक, सहकारी बँक, राष्ट्रीय गृहनिर्माण बँक आदींकडून कर्ज घेणे आवश्यक असते.

नोंदणी मुद्रांक शुल्कावर दावा :
निवासी गृह मालमत्तेच्या हस्तांतरणाशी संबंधित मुद्रांक शुल्क, नामांकन शुल्क आणि इतर काही खर्च ८० सी अंतर्गत दावा केला जाऊ शकतो. व्यावसायिक मालमत्तेसाठी, या खर्चाचा दावा 80 सी अंतर्गत केला जाऊ शकत नाही.

घाईगडबडीत पैसे कमवू नका :
कर वाचविण्याच्या लालसेपोटी घाईगडबडीत गुंतवणूक करू नये. त्यामुळे गुंतवणुकीचा चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हुशारीने गुंतवणूक करा आणि केवळ कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करू नका.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: ITR Filing Update on 80C check details 27 July 2022.

हॅशटॅग्स

#ITR Filing Update(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x