15 January 2025 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Jamin Mojani | भावकीत लफडी नको, असा करा जमीन मोजणीचा अर्ज आणि भविष्यातील कौटुंबिक वाद टाळा

Jamin Mojani

Jamin Mojani | अनेक गावांमध्ये वडीलोपार्जी अलेली जमिन कसली जाते. मात्र अनेकदा सातबा-यावर असलेली जमिन आपल्याकडे प्रत्यक्षात असलेली दिसत नाही. असे झाल्यावर आपल्या जमिनीवर दुसरी व्यक्ती हक्क दाखवत आहे का? असे आपल्याला वाटते. त्यामुळे आपल्याला शासकीय मोजणी आणावी असे वाटते.

जमिनीचे वेगवेगळे वाद उभे राहतात
अनेक वेळा जमिनीचे वेगवेगळे वाद उभे राहतात. हे वाद विकोपाला गेल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अनेक गावांमध्ये जमिनीच्या वादावरून घातपात झाल्याचे गंभिर गुन्हे देखील घडले आहेत. त्यामुळे जमिनीची मोजणी हा एक उत्तम पर्याय ठरतो. मात्र जमिनीची मोजणी कशी करावी. त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज लागते. अर्ज कसा करावा या सर्वांची माहिती आज या बातमीतून जाणून घेणार आहोत.

Bhumiabhillekh.maharashtra.gov.in या शासनाच्या वेबसाइटवर तुम्हाला मोजणीसाठी जो ऑफलाइन अर्ज करावा लागतो त्याचा नमुना मिळेल. या अर्जात अर्जदाराचे नाव, पत्ता, ज्या जिल्हयात ती जमिन आहे त्याचे आणि तालूक्याचे नाव टाकावे लागते. तसेच यावर तुम्ही मोजणी कोणत्या कारणासाठी करत आहात ते लिहावे लागते.

तसेच कोणत्या कालावधीत मोजणी हवी आहे हे देखील लिहावे. कारण लिहिताना त्यावर जमिनिची हद्द जाणून घेणे किंवा बांधावर अतिक्रमण अशी कारणे लिहू शकता. यानंतर तुमची जमिन ज्या गट क्रमांकात येते तो गट क्रमांक टाकणे गरजेचे आहे. तसेच तुमच्या गावाचे नाव देखील लिहा.

शुल्क आकारले जाते :
तुम्हाला कोणत्या क्षेत्राची मोजणी करायची आहे तसेच किती कालावधीत ती व्हावी असे तुम्हाला वाटते त्यावर तुमच्याकडून शुल्क आकारले जाते. म्हणजेच कालावधी आणि क्षेत्रानुसार तुम्हाला जमिन मोजणीची फी भरावी लागते. ही मोजणी शासनाकडून असली तरी ती विनाशुल्क मुळीच नाही.

तुमचा भरलेला अर्ज तालुका स्थरीय शेतकरी भूमी अभिलेख उप-अधीक्षक यांच्याकडे जमा करावा. किंवा नगर भूमापन अधिकारी कार्यालयात देखील तुम्ही अर्ज जमा करू शकता. यावर पुढे तुम्हाला कालावधी दिला जातो त्यात तुमची मोजणी होते. जर तुमच्या सातबा-यावर एका पेक्षा जास्त व्यक्तींची नावे असतील तर तुम्हाला त्या सर्वांच्या नाहरकत सह्या अर्जाबरोबर सादर कराव्या लागतात. ते न केल्यास मोजणी होत नाही.

मोजणी आणण्यासाठी तुम्हाला मोजणीचा अर्ज, फी भरल्याची पावती, ३ महिन्यांच्या आत असलेली सातबारा प्रत ही कागदपत्रे दाखवावी लागतात. ही कागदपत्रे दाखवल्यावर तुमच्या शेतात मोजणी येते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Jamin Mojani BhumiAbhilekha how to apply for land survey 01 April 2023.

हॅशटॅग्स

Jamin Mojani(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x