7 January 2025 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS
x

JFSL Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर्स अल्पावधीत मल्टिबॅगरच्या दिशेने सुसाट, रोज मिळतोय मजबूत परतावा

JFSL Share Price

JFSL Share Price | मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 244.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत ट्रेड करत आहे. काल प्रमाणे आज देखील जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. डी-मर्जरनंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते.

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी रहा स्टॉक 278.20 रुपये किमतीवर पोहचला होता. मात्र नंतर स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढल्याने 25 ऑगस्ट 2023 रोजी शेअरची किंमत 205.15 रुपयेपर्यंत खाली आली होती. आज शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 3.32 टक्के वाढीसह 241.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच शेअर बाजारात एक बातमी आली होती की, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने 25 ऑगस्ट 2023 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे 3.72 कोटी शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. या गुंतवणूकीत त्यांनी कंपनीचे एकूण 0.6 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत.

मोतीलाल ओसवाल म्युचुअल फंडने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉकमध्ये एकूण 754 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. यासह जामनगर युटिलिटीज अँड पॉवर या रिलायन्स कंपनीच्या प्रवर्तक युनिटने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे 5 कोटी शेअर्स खरेदी करून गुंतवणूक केली आहे. या शेअरची डील 208-211 रुपयेमध्ये झाली आहे. नुवामा फर्मच्या अंदाजानुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स S&P BSE सेन्सेक्स इंडेक्समधून डिलिस्ट होऊ शकतात.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी लवकरच विमा व्यवसाय क्षेत्रात देखील प्रवेश करणार आहे. अशी बातमी मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केली होती. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी केवळ वित्तीय क्षेत्रातील विद्यमान कंपन्यांशी स्पर्धा करणार नाहीत तर, कंपनी ब्लॉकचेन आधारित प्लॅटफॉर्म आणि CBDC या सारख्या माध्यमांचा देखील वापर करून व्यवसाय विस्तार करणार आहे. जिओ टेलिकॉम आणि जिओ रिटेलप्रमाणेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यात प्रतीबद्ध आहे, मुकेश अंबानी म्हणाले.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JFSL Share Price today on 01 September 2023.

हॅशटॅग्स

JFSL Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x