18 November 2024 3:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Jhaveri Credits Share Price | श्रीमंत करणारा शेअर खरेदी करा, दिला 19185% परतावा, तर 3 वर्षात 6926% कमाई

Jhaveri Credits Share Price

Jhaveri Credits Share Price | झवेरी क्रेडिट्स अँड कॅपिटल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घ कालावधीत अप्रतिम कमाई करून दिली आहे. या कंपनीचे शेअर्स जुलै 2020 मध्ये 1.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 350 रुपयेच्या पार गेला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स तब्बल 19185 टक्के वाढले आहेत. ( झवेरी क्रेडिट्स अँड कॅपिटल कंपनी अंश )

गेल्या तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6926 टक्के नफा कमावून दिला आहे. जुलै 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 5.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 310 टक्के वाढवले आहेत. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी झवेरी क्रेडिट्स अँड कॅपिटल स्टॉक 3.70 टक्के घसरणीसह 351 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

जून 2024 मध्ये झवेरी क्रेडिट्स अँड कॅपिटल स्टॉक 4 टक्के घसरला होता. तर मे 2024 मध्ये शेअरची किंमत 2.6 टक्के, एप्रिलमध्ये 23 टक्के आणि मार्चमध्ये 5 टक्क्यांनी घसरली होती. फेब्रुवारी 2024 मध्ये झवेरी क्रेडिट्स अँड कॅपिटल स्टॉक तब्बल 21 टक्क्यांनी मजबूत झाला होता. तर जानेवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 47 टक्क्यांनी वाढले होते.

2 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 527.30 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 30 टक्क्यानी स्वस्त झाला आहे. 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 90.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 305 टक्के वाढला आहे.

10 जुलै 2024 रोजी SEBI ने झवेरी क्रेडिट्स अँड कॅपिटल कंपनीला ESM अंतर्गत ठेवले आहे. गुंतवणूकदारांचे संरक्षण आणि शेअर बाजाराची अखंडता अबाधित राहावी यासाठी सेबी असे पाऊले उचलत असते. झवेरी क्रेडिट्स अँड कॅपिटल लिमिटेड ही कंपनी भारतातील कमोडिटी ब्रोकिंग क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीची स्थापना 1993 साली वडोदरा गुजरात येथे झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jhaveri Credits Share Price NSE Live 20 July 2024.

हॅशटॅग्स

Jhaveri Credits Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x