22 November 2024 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या या स्टॉकमध्ये 1 महिन्यात 43 टक्के वाढ

Jhunjhunwala Portfolio

Jhunjhunwala Portfolio | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये ह्या स्टॉकमध्ये 4.28 टक्के वाढ पाहायला मिळाली आणि किंमत 63.35 रुपयांच्या जवळपास गेली आहे. 63.38 रुपये किंमत ह्या स्टॉकची दोन वर्षांच्या उच्चांकी पातळी आहे. जबरदस्त तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी दिसून आली आहे.

राकेश झुनझुनवाला पोर्टफोलिओ स्टॉक :
राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या करूर व्यास्या बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. शुक्रवारी ट्रेडिंग सेशनच्या दिवशी शेअरमध्ये 4.28 टक्के वाढ झाली आणि त्याची किंमत वाढून 63.35 रुपयांच्या जवळपास म्हणजेच दोन वर्षांच्या उच्चांक पातळीवर गेली आहे. उत्कृष्ट तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी आली आहे. बाजारातील तज्ज्ञही करूर व्यास्या बँकेच्या शेअर्सच्या बाबतीत सकारात्मक असून ते स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.

मागील एका महिन्याची कामगिरी :
या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या स्टॉक 43 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. तर S&P BSE सेन्सेक्स निर्देशांकात 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. डिसेंबर 2019 पासून ते उच्च पातळीवर व्यापार करत आहे. 18 सप्टेंबर 2017 रोजी या शेअरने 137 रुपयांच्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला होता.

पुढील लक्ष्य किंमत :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीज आणि एमके ग्लोबल या बँकिंग स्टॉकच्या बाबतीत अतिशय सकारात्मक आहेत. आणि त्यांनी त्याला ‘बाय'(खरेदी) टॅग दिला आहे. ICICI सिक्युरिटीजने करूर व्यासा बँकेच्या स्टॉकवर 80 रुपयेच्या लक्ष्य किंमतीसह खरेदीचा सल्ला दिला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी लक्ष किंमत गाठण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल असा अंदाज वर्तवला आहे. त्याच वेळी, एमके ग्लोबलने करूर व्यासा बँकेच्या शेअर्ससाठी 78 ची लक्ष्य किंमत ठरवली आहे. जी सध्याच्या ट्रेडिंग किमत 63.35 रुपयेपेक्षा 23.13 टक्के जास्त आहे.

राकेश झुनझुनवाला ची होल्डिंग 4.50 टक्के :
शेअरहोल्डिंग पॅटर्न डेटानुसार, दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याकडे जून 2022 तिमाहीच्या अखेरीस करूर व्यासा बँकेत 4.50 टक्के वाटा आहे. त्याचप्रमाणे इतर दिग्गज गुंतवणूकदारांचाही ह्या स्टॉक मध्ये जबरदस्त वाटा आहे. आशिष धवन यांच्याकडे 1.3 टक्के वाटा आहे. आणि मुकुल महावीर अग्रवाल यांच्या कडे 1.25 टक्के वाटा आहे. यांसारखे करूर व्यासा बँकेतील इतर प्रमुख गुंतवणूकदारांकडे या बँकेत 1 टक्‍क्‍यांहून अधिक भागीदारी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jhunjhunwala Portfolio holding Karur vyasa bank share price return on 6 August 2022.

हॅशटॅग्स

#Jhunjhunwala Portfolio(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x