5 November 2024 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील हा स्टॉक रॉकेट वेगाने वाढतोय, शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी

Rakesh jhunjhunwala Multibagger stock

Rakesh Jhunjhunwala portfolio | राकेश झुनझुनवाला ज्या स्टॉक मध्ये पैसे लावतात तो स्टॉक रॉकेट सारखा वर जातो. असाच एक स्टॉक सोमवारी 16.12% वाढला आणि 615.55 रुपयांवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, हा शेअर बीएसईवर 16.52% च्या उसळीसह प्रति शेअर 617.75 रुपयांवर ट्रेड करत आहे.

राकेश झुनझुनवाला यांचा स्टॉक :
राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेली ऑनलाइन गेमिंग कंपनी नजारा टेक्नॉलॉजी च्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. सोमवारी एनएसई वर या कंपनीने 16.12 टक्के ची वाढ नोंदवली आणि 615.55 रुपयांवर वट्रेड करत आहे. त्याच वेळी, हा शेअर बीएसईवर 16.52% च्या उसळीसह प्रति शेअर 617.75 रुपयांवर ट्रेड करत आहे. एनएसई वर जुलै 2022 मध्ये हा कंपनीच्या शेअर्सनी 475.05 रुपये ही 52 आठवड्यांची नीचांकी पातळीवर गाठली होती. सध्याच्या नवीन किंमतीनुसार, स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून 30.04 टक्के वर ट्रेड करत आहे.

कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण :
कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीचा जबरदस्त तिमाही निकाल. मागील आठवड्यात, कंपनीने पहिल्या तिमाहीत निकालत सकारात्मक नफा जाहीर केला आहे. ट्रेडिंग च्या सुरुवातीला नजारा टेक्नॉलॉजीजच्या शेअरची किंमत 625.50 रुपये वर पोहोचली होती. याआधी शुक्रवारी शेअर ची किंमत 530.10 रुपये होती.

बाजार विश्लेषकांचे मत :
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, एप्रिल ते जून 2022 या तिमाहीत कंपनीने नोंदवलेली बहुतांश नफ्यातील वाढ ही कंपनीच्या विलीनीकरण आणि अधिग्रहणामुळे झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेली ही ऑनलाइन गेमिंग कंपनी अजूनही आपली लक्ष किंमत गाठण्यापासून खूप मागे आहे. त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या प्रॉफिट-बुकिंग होताना दिसत आहे. त्यामुळे येथून पुढे स्टॉकमध्ये मर्यादित चढ-उतार होताना दिसू शकतात. जून तिमाहीत कंपनीच्या एकूण निव्वळ नफ्यात वार्षिक 22 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. नजारा टेक्नॉलॉजी ने पहिल्या तिमाहीत 16.50 कोटी रुपयेचा नफा नोंदवला होता. याच काळात कंपनीच्या महसुलात सुमारे 70 टक्के वाढ नोंदविण्यात आली होती.

पुढील लक्ष किंमत :
प्रसिद्ध ब्रोकिंग हाऊस चे अर्थ तज्ञ म्हणाले की, “या ऑनलाइन गेमिंग स्टॉकने नीचांकी पातळी गाठली आहे आणि 525 रुपये ते 550 रुपये दरम्यानची किंमत शेअरचे मजबूत समर्थन क्षेत्र आहे. शेअर्स 650 रुपये ते 670 रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे.” असे तज्ञ म्हणतात. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे नजारा टेक्नोलॉजी चे 65 लाख शेअर्स आहेत. नाजारा टेक्नॉलॉजीजच्या एप्रिल ते जून 2022 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे तब्बल 65,88,620 शेअर्स आहेत.म्हणजेच त्यांच्याकडे कंपनीचा एकूण 10.03 टक्के वाटा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jhunjhunwala Portfolio Nazara Technology share price returns on 2 August 2022.

हॅशटॅग्स

#RakeshJhunjhunwala(50)portfolio(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x