Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील हे 5 शेअर्स तगडा रिटर्न देत आहेत, हे स्टॉक्स तुमच्याकडे आहेत?

Jhunjhunwala Portfolio | राकेश झुनझुनवाला भारतीय शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, गुंतवणूकदार त्यांचा आदर्श समोर ठेऊन त्यांच्या सारखं मोठे गुंतवणूकदार होण्याचं स्वप्न पाहत असतात. त्यांच्या पोर्टफोलिओ मधील स्टॉक ची माहिती घेणे गुंतवणूकदारांसाठी नेहमी उत्सुकतेचे असते. वास्तविक, राकेश झुनझुनवाला यांच्या अनेक स्टोकने मागील काही महिन्यात जबरदस्त परतावा दिला आहे.
राकेश झुनझुनवाला पोर्टफोलिओ स्टॉक :
किरकोळ गुंतवणूकदार नेहमी शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ तपासत असतात आणि त्यातून त्यांची गुंतवणूक पद्धत जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर ते त्यांच्या शेअरची कामगिरीची आणि अलीकडील सेशनमधील प्रमुख निर्देशांकांद्वारे झालेल्या उलाढालींची तुलना करतात. भारतीय शेअर बाजारातील अशा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मधील शेअरची माहिती घेणे फायदेशीर ठरू शकते. वास्तविक, राकेश झुनझुनवाला यांच्या अनेक स्टॉकने मागील एका महिन्यात घसघशीत परतावा दिला आहे. शेअर बाजारातील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांच्या 5 आवडत्या कंपन्यांची माहिती जाणून घेऊया, ज्यांत मागील एका महिन्यात 23% वाढ झाली आहे.
फेडरल बँक :
एप्रिल 2022 या महिन्यात फेडरल बँकेचा शेअर आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. फेडरल बँकेच्या शेअर मध्ये मे 2022 च्या मध्यापर्यंत 25 टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणावर विक्री झाली आहे आणि त्याची किंमत खाली आली. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आपल्या तिमाही निकालांच्या घोषणेनंतर, या बँकिंग स्टॉकमध्ये स्थिर वाढ होतना दिसत आहे. फेडरल बँकेच्या शेअरनी जोरदार पुनरागमन केले आहे. तसेच फेडरल बँकेने आपला 52 आठवड्याचा टप्पा गाठला असून 109.45.रुपये वर पोहोचला आहे. मागील एका महिन्यात, स्टॉक च्या किमतीत ₹89 वरून ₹107.50 रुपये एवढी वाढ झाली आहे. या कालावधीत स्टॉकने सुमारे 23% ची वाढ नोंदवली आहे.
एस्कॉर्ट्स कुबोटा :
राकेश झुनझुनवाला यांनी एप्रिल ते जून 2022 या दुसऱ्या तिमाहीत ह्या ऑटो सेक्टर मधील स्टॉकमध्ये गुंतवणूक केली. या ट्रॅक्टर निर्मात्या कमावांनीच्या शेअर्समध्ये एका वर्षात नोव्हेंबर २०२१ अखेरपर्यंत प्रचंड वाढ झाली होती. तथापि, डिसेंबर 2021 च्या सुरुवातीपासून स्टॉक मध्ये स्थिरता दिसून येत, नंतर या स्टॉक ला जबर विक्रीचा फटका बसला आणि स्टॉक कोसळला. एप्रिल ते जून अखेरीस हा विक्रीच्या गर्तेत अडकला होता. पण जुलै 2022 मध्ये एस्कॉर्ट्स कुबोटाच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली. मागील एका महिन्यात हा शेअर 1466.50 रुपयांवर ट्रेड करत होता तर आता हा स्टॉक 1,717.05 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजेच ह्या स्टॉक ने जवळपास 17.12% चा भरघोस परतावा दिला आहे.
टाटा मोटर्स :
राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये ह्या स्टॉक चा वाटा गेल्या वर्षभरात 50% पेक्षा जास्त वाढला आहे. ऑक्टोबर 2021 च्या सुरुवातीला हा स्टॉक अपट्रेंडमध्ये होता म्हणजे त्यात वाढ होत होती. टाटा मोटर्सच्या स्टॉकमध्ये ऑक्टोबर 2021 मध्ये किंचित स्थिरता आली होती. पण फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यात थोडी वाढ पाहायला मिळाली होती. मार्च महिन्याच्या मध्यापासून ते जून 2022 पर्यंत, टाटा मोटर्सच्या स्टॉक ने तळ गाठला होता. मात्र, गेल्या एका महिन्यात टाटा मोटर्स च्या स्टॉकमध्ये 15.50% वाढ झालेली दिसून येते.
टायटन कंपनी :
ही टाटा समूहाची एक लक्झुरीयस ब्रँड कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स ऑक्टोबर 2021 च्या मध्यापासून ते मार्च 2022 पर्यंत सतत पडत होते. वार्षिक दर वाढीची आकडेवारी पाहिली तर असे दिसेल की हा स्टॉक 8.14% पर्यंत खाली आला आहे. तरीही, जुलै 2022 च्या सुरुवातीपासून स्टॉकमध्ये अपट्रेंड पाहायला मिळत आहे. या कालावधीत स्टॉकमध्ये 14.13% वाढ झाली आहे.
स्टार हेल्थ :
भारतीय शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून ते आतापर्यंत, हा विमा सेक्टर मधील स्टॉक बऱ्याच काळापासून नकारात्मक व्यवहार करत होता. पण, मागील एका महिन्यात या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 13.77% परतावा दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Jhunjhunwala Portfolio stock returns on 23 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA