18 November 2024 10:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Jindal Saw Share Price | मालामाल शेअर! जिंदाल सॉ शेअरने सहा महिन्यात 132% परतावा दिला, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, कारण काय?

Jindal Saw Share price

Jindal Saw Share Price | मागील 3 वर्षात जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. 29 जून 2020 रोजी जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीचे शेअर 58.20 रुपयेवर ट्रेड करत होते. तर 28 जून 2023 रोजी जिंदाल सॉ लिमिटेड स्टॉक 256.85 रुपये किमतीवर पोहचला होता. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी जिंदाल साँ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.70 टक्क्यांच्या घसरणीसह 255.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

लोखंड आणि स्टील पाईप्सची विक्री करणाऱ्या जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीच्या शेअरने अवघ्या 3 वर्षांच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 341 टक्के नफा कमावून दिला आहे. या कालावधीत सेन्सेक्समध्ये देखील 81.73 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. म्हणजेच सेन्सेक्सच्या तुलनेत जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 4 पट अधिक नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 226.73 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2023 या वर्षात जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 132.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार तज्ञांनी जिंदाल सॉ लिमिटेड स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 296 रुपये किमतीवर पोहोचू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 264.40 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 76.90 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jindal Saw Share price today on 01 July 2023.

हॅशटॅग्स

Jindal Saw Share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x