18 November 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News
x

Jindal Stainless Share Price | एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का?

Highlights:

  • 52 आठवड्यांची पातळी
  • मागील एका वर्षात 139 टक्के परतावा
  • कंपनीच्या निव्वळ नफ्यात 20 टक्क्यांची घसरण
  • शेअर टार्गेट प्राईस
Jindal Stainless Share Price

Jindal Stainless Share Price | मागील काही दिवसांपासून ‘जिंदाल स्टेनलेस’ कंपनीचे शेअर्स कमालीची कामगिरी करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिंदाल ग्रुपचा भाग असलेल्या ‘जिंदाल स्टेनलेस’ कंपनीचे शेअर्स 5.51 टक्के वाढीसह 301.4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी (Jindal Stainless Share Price NSE) या कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 290.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Jindal Stainless Share Price BSE)

52 आठवड्यांची पातळी
8 मार्च 2023 रोजी ‘जिंदाल स्टेनलेस’ कंपनीच्या शेअरने 329 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पत्की स्पर्श केली होती. तर 20 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 95.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या नीचांक किंमत पातळीपासून शेअरची किंमत 217 टक्के म्हणजेच 206 रुपये वाढली आहे.

मागील एका वर्षात 139 टक्के परतावा
स्टेनलेस स्टील निर्मात्या ‘जिंदाल स्टेनलेस’ कंपनीचे शेअर्स यावर्षी 25.44 टक्के मजबूत झाले आहेत. मागील एका वर्षात ‘जिंदाल स्टेनलेस’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 139 टक्के परतावा कमावून दिला आहे.

कंपनीच्या निव्वळ नफ्यात 20 टक्क्यांची घसरण
YOY आधारे मार्च 2023 तिमाहीत जिंदाल स्टेनलेस कंपनीच्या निव्वळ नफ्यात 20 टक्क्यांची घसरण झाली. आणि कंपनीने या काळात कंपनीने 716.29 कोटी रुपये नफा कमावला आहे. तिमाही आधारावर ‘जिंदाल स्टेनलेस’ कंपनीने डिसेंबर तिमाहीत 512 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ‘जिंदाल स्टेनलेस’ कंपनीचा ऑपरेशन्स मधील महसूलात वाढ झाली असून, कंपनीने 9,765.08 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाही काळात कंपनीने 9,725.91 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

‘जिंदाल स्टेनलेस’ कंपनीच्या संचालक मंडळाने सुधारित आर्थिक कामगिरीमुळे आपल्या शेअर धारकांना 1.50 रुपये अंतिम लाभांश आणि एक रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यामुळे एकूण लाभांश पेआउट 2.50 रुपये झाला आहे.

शेअर टार्गेट प्राईस
त्याचबरोबर कर्जरोखे देऊन 5 हजार कोटी रुपये भांडवल उभारण्याच्या प्रस्तावालाही संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते अल्पावधीत ‘जिंदाल स्टेनलेस’ कंपनीचे शेअर 321-330 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ICICI डायरेक्टच्या तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स 2023 वर्षाच्या अखेर पर्यंत 350 रुपये किमतीवर पोहोचू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jindal Stainless Share Price today on 24 May 2023.

FAQ's

How to Buy Jindal Stainless Share?

आपण जिंदाल स्टेनलेस कंपनीचे शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.

What is the Share Price of Jindal Stainless?

कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. २४ मे २०२३ रोजी जिंदाल स्टेनलेस शेअरची किंमत रु.२९१.०० आहे.

What is the Market Cap of Jindal Stainless?

मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. 24 मे 2023 पर्यंत जिंदाल स्टेनलेसचे मार्केट कॅप 24,357 कोटी रुपये आहे.

What is the PE and PB ratio of Jindal Stainless?

24 मे 2023 पर्यंत जिंदाल स्टेनलेसचे पीई आणि पीबी गुणोत्तर 9.49669 आणि 2.04147 आहे.

What is the 52 Week High and Low of Jindal Stainless?

५२ आठवड्यांचा उच्चांक/नीचांकी दर हा त्या दिलेल्या कालावधीत (१ वर्षासारखा) जिंदाल स्टेनलेस स्टॉकने व्यवहार केलेला सर्वोच्च आणि सर्वात कमी भाव आहे आणि तो तांत्रिक सूचक मानला जातो. 24 मे 2023 रोजी जिंदाल स्टेनलेसची 52 आठवड्यांची उच्चांकी आणि नीचांकी किंमत 327.83 रुपये आणि 94.71 रुपये आहे.

हॅशटॅग्स

Jindal Stainless Share price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x