22 November 2024 5:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजी वाढणार - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सध्या खूप चढ-उतार होत आहेत. मागील 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत स्टॉक मार्केट निफ्टी 10 टक्क्यांनी घसरला आहे, तर स्टॉक मार्केट सेन्सेक्स 8000 अंकांनी (NSE: JIOFIN) घसरला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 6.61 टक्के वाढून 319.20 रुपयांवर पोहोचला होता. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)

बुधवारी स्टॉक मार्केटमधील काही सूचिबद्ध कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल सादर केले होते. त्याचा परिणाम गुरुवारी शेअर्सवर पाहायला मिळाला आहे. त्याचबरोबर F&O मध्ये सामील होणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तुफान तेजी दिसून येत आहे.

जिओ फायनान्शियल शेअर तेजीत

गुरुवारी रिलायन्स ग्रुपच्या मालकीची जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून आली आहे. आज सकाळी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा शेअर 299.40 च्या बंद भावापेक्षा 6.40 टक्क्यांनी वधारून 318.55 रुपयांवर ट्रेड करत होता. स्टॉक मार्केटमधील घसरणीच्या काळात जिओ फायनान्शियल शेअर्समध्ये एवढी वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनी F&O लिस्टमध्ये सामील झाली आहे.

F&O ट्रेडिंगसाठी पात्र

एनएसईने माहिती दिली आहे की, ‘ट्रेडिंग फ्युचर्स आणि ऑप्शन कॉन्ट्रॅक्टसाठी एकूण 45 शेअर्सचा समावेश करण्यात आला आहे, जे 29 नोव्हेंबर 2024 पासून ट्रेडिंग सुरू होईल. यामध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, अदानी एनर्जी सोल्युशन लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, पेटीएम, झोमॅटो, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपन्यांचा समावेश आहे.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

मागील १ महिन्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर 6.32% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 9.62% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 42.11% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 35.81% परतावा दिला आहे.

तेजीची मोठी शक्यता

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 2,02,384 कोटी रुपये आहे. जिओ फायनान्शियल शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 394.70 रुपये, तर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 215.05 रुपये होता. जिओ फायनान्शियल शेअरचा नफा ते उत्पन्न (P/E) गुणोत्तर १२५.३५ आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर पुढील वर्षी मार्चमध्ये निफ्टीमध्ये सामील होण्याचा प्रमुख दावेदार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये जिओ फायनान्शियल कंपनी आपला सेकंड हाफ रिझल्ट जाहीर करू शकते. त्यामुळे येत्या काळात जिओ फायनान्शियल शेअर्समध्ये चांगली वाढ दिसेल, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price 14 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x