23 February 2025 3:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Jio Finance Share Price | तज्ज्ञांकडून जिओ फायनान्शियल शेअरसाठी BUY रेटिंग, स्टॉक प्राईस 500 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार

Highlights:

  • Jio Finance Share PriceNSE: JioFinance – जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश
  • कंपनीची मोठी गुंतवणूक
  • जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म – BUY रेटिंग – Jio Financial Services Share Price
Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स आज किंचित घसरणीसह क्लोज झाले आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे (NSE: JioFinance) शेअर्स 1.89 टक्के वाढीसह 353.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, या कंपनीला परकीय थेट गुंतवणुकीसाठी मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या परकीय गुंतवणुकीची मर्यादा त्याच्या पेड-अप इक्विटी शेअरभांडवलाच्या 49 टक्के पर्यंत वाढविण्याच्या विनंतीला मंजुरी दिली आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)

कंपनीची मोठी गुंतवणूक
आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 0.17 टक्के घसरणीसह 353.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने नुकताच Jio Payments Bank Limited मध्ये 68 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीनंतर JPBL मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा हिस्सा 78.95 टक्केवरून 82.17 टक्के वाढला आहे. याव्यतिरिक्त, Jio Leasing Services Limited या जिओ फायनान्शियल कंपनीच्या उपकंपनीने रिलायन्स इंटरनॅशनल लीजिंग IFSC लिमिटेडचे 6.75 दशलक्ष प्रेफरन्स शेअर्समध्ये 67.50 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म – BUY रेटिंग
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक आपल्या 20 दिवस आणि 200 दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते पुढील 6 ते 20 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 385 ते 500 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 300 रुपये किमतीवर स्टॉप-लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक आणि नीचांक किंमत पातळी अनुक्रमे 394.70 रुपये आणि 204.25 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 54.24 टक्के नफा कमवून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price 23 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x