22 January 2025 1:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

Jio Finance Share Price | रॉकेट तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला मोठं यश मिळालं आहे. जिओ पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड (NSE: JIOFIN) या कंपनीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीने स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे की, ‘ऑनलाइन पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी RBI ने मान्यता दिली आहे. या बातमीमुळे जिओ फायनान्शियल लिमिटेड कंपनी शेअर तेजीत आले आहेत. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.89 टक्के वाढून 325.80 रुपयांवर पोहोचला होता. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)

विस्ताराची संधी आहे
एकाबाजूला पेटीएम कंपनी आरबीआयच्या कारवाईत अडकलेली असताना जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीला ही मंजुरी मिळाली आहे. या संधी मुळे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा मार्केटमध्ये हिस्सा वाढण्याची शक्यता आहे. जिओ पेमेंट्स बँक ही जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा भाग आहे.

जिओ फायनान्स अ‍ॅप लाँच
नुकतेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने नवीन जिओ फायनान्स अ‍ॅप लाँच करण्याची घोषणा केली होती. 30 मे 2024 रोजी या अ‍ॅपचा बीटा व्हर्जन लाँच करण्यात आला होता. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची NBFC कंपनी गृहकर्ज सेवा सुरू करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय जिओ फायनान्शियल कंपनी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आणि लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज सारखी इतर उत्पादनेही विकणार आहे.

कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल
दुसऱ्या तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला ६८९ कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला ६६८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. दुसऱ्या तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून ६९४ कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ६०८ कोटी रुपये इतका होता.

शेअरने किती परतावा दिला
मागील १ महिन्यात हा शेअर 7.07% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 14.38% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 48.77% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 38.90% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price 29 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x