20 April 2025 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

Jio Finance Share Price | बंपर रॅलीचे संकेत, जिओ फायनान्शियल स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सध्या एनबीएफसी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. दरम्यान, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आता एफ अँड ओ सेगमेंटचा एक भाग झाल्याने शेअर्सवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. शुक्रवारी जिओ फायनान्शियल शेअरमध्ये अडीच टक्क्यांची वाढ झाली होती. सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी जिओ फायनान्शियल शेअर 0.50 टक्के वाढून 341.45 रुपयांवर पोहोचला होता. (जिओ फायनान्शियल कंपनी अंश)

जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

दरम्यान, ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांनी जिओ फायनान्शियल शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. तसेच तज्ज्ञांनी या शेअरसाठी टार्गेट प्राईस सुद्धा दिली आहे. जिओ फायनान्शियल लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 394.70 रुपये होता, तर जिओ फायनान्शियल लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 229 रुपये होता. सध्या जिओ फायनान्शियल लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,17,028 कोटी रुपये आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर प्राइस टार्गेट

दैनंदिन चार्टनुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर ब्रेकआऊटच्या पातळीवर घसरणाऱ्या ट्रेंडलाइनवर ट्रेड करत आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर २०० दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या खाली गेला होता. त्या पातळीवरून शुक्रवारची क्लोजिंग प्राईस सुद्धा २०० डीएमएच्या आसपास होती. शेअरचा मोमेंटम इंडिकेटर सुद्धा तेजीच्या झोनमध्ये आहे. एकंदरीत चार्ट पॅटर्न ज्या पद्धतीने तयार झाला आहे, त्यामुळे जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊटच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. त्यामुळे त्यामुळे तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना जिओ फायनान्शियल शेअर ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे.

मात्र जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने शुक्रवारचा उच्चांकी ३४५ रुपयांचा स्तर ओलांडला तरच गुंतवणूकदारांनी खरेदी करावा असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे. जिओ फायनान्शियल शेअर लवकरच ब्रेकआऊट देऊ शकतो. गुंतवणूकदारांनी ३४५ रुपयांच्या पातळीवर नवीन खरेदी करताना ३३५ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देण्यात आला आहे. पुढे जाऊन जिओ फायनान्शियल शेअर ३६५ ते ३७५ रुपयांपर्यंत वाढू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

जिओ फायनान्शियल शेअरने 58.83% परतावा दिला

मागील ५ दिवसात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने 1.59% परतावा दिला आहे. मागील एक महिन्यात या शेअरने 7.10% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 5.99% घसरला आहे. मागील १ वर्षात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने 42.18% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने 58.83% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price Monday 16 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या