18 April 2025 9:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. या तेजी दरम्यान ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या एनबीएफसी कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमध्ये पुलबॅक पाहायला मिळत आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचे संकेत मिळत आहेत. तज्ज्ञांनी या शेअरसाठी टार्गेट प्राइस आणि स्टॉपलॉस देखील जाहीर केली आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरबाबत तज्ज्ञांनी काय म्हटले

स्टॉक मार्केट विश्लेषक सचिन यांनी या शेअरबाबत सांगितले की, ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर्ससाठी ३०० रुपयांची पातळी महत्त्वाची होती. शेअरने या पातळीवर सपोर्ट बनवला होता. मात्र शेअरची ही सपोर्ट लेव्हल तुटली आहे. गेल्या महिन्याभरात या शेअरमध्ये 9.37 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात शेअर २६५ रुपयांच्या पातळीपासून पुन्हा सावरला आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट विश्लेषक सचिन यांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरबाबत पुढे सांगितले की, ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरला खालच्या बाजूला २५५ रुपयांवर सपोर्ट झोन आहे. गुंतवणूकदार २५५ रुपयांवर स्टॉपलॉस सेट करून शेअर ‘HOLD’ करू शकतात. पुढे जिओ फायनान्शियल शेअर 300 रुपयांच्या लेव्हलवर पुन्हा पोहोचू शकतो. शेअरने ही पातळी तोडल्यानंतर पुढे तो ३३० ते ३४० रुपयांपर्यंत वाढू शकतो.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर 1.15 टक्क्यांनी घसरून 275.80 रुपयांवर पोहोचला होता. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 394.70 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 237.10 रुपये होती. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,75,129 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price Monday 20 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या