18 November 2024 5:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Jio Finance Share Price | आता हा शेअर थांबणार नाही! तज्ज्ञांकडून शेअरच्या मजबूत सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस जाहीर

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहे. अवघ्या पाच महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 362.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीपासून 8.17 टक्के खाली ट्रेड करत आहेत. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )

आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 2.04 टक्के वाढीसह 364.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ऑगस्ट 2023 पासून आतापर्यंत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 68 टक्क्यांपेक्षा जास्त कमावून दिला आहे. जिओ फायनान्स सर्व्हिसेस ही कंपनी पूर्वी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या नावाने ओळखली जात होती.

या कंपनीने नुकताच आपला JioFinance अॅप लाँच केला आहे. या अॅपच्या माध्यमातून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आपल्या ग्राहकांना डिजिटल बँकिंग, UPI व्यवहार, बिल स्टेटमेंट, विमा सल्लागार आणि बचत खाते यासारखे सेवा प्रदान करणार आहे. यासह ही कंपनी म्युच्युअल फंडावर कर्ज देणार आहे.

मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने BlackRock Inc आणि BlackRock Advisors Singapore Private Limited सोबत पैसे व्यवस्थापन आणि ब्रोकिंग प्लॅटफॉर्म स्थापन करण्यासाठी करार केला होता. एंजल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या स्टॉकने 358 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. जर हा स्टॉक विक्रीच्या दबावात आला तर शेअरची किंमत 350-335 रुपयेवर जाऊ शकते. आणि तेजीच्या काळात हा स्टॉक 390 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 380 रुपये किमतीवर जाईल. हा स्टॉक खरेदी करण्यासाठी तज्ञांनी 350 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉकने 358 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला 367 रुपये किमतीवर रेझिस्टन्स मिळत आहे. मार्च 2024 प्रवर्तकांनी या कंपनीचे 47.22 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Finance Share Price NSE Live 18 June 2024.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x