14 January 2025 5:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

Jio Finance Share Price | आता नाही थांबणार हा शेअर! जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत नवीन अपडेट, फायदाच फायदा

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जेएफएसएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच RBI ने जेएफएसएल कंपनीला नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीमधून मुख्य गुंतवणूक कंपनीमध्ये रूपांतर करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 0.81 टक्के वाढीसह 330.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( जिओ फायनान्शिअल कंपनी अंश )

जिओ फायनान्शिअल या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.04 लाख कोटी रुपये आहे. 23 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 394.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमती वर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 18 टक्के खाली आला आहे. 23 ऑक्टोबर 2023 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 204.65 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. या किंमतीवरून हा स्टॉक 55 टक्के वाढला आहे.

मागील 12 महिन्यांत जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 18 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात जिओ फायनान्शिअल स्टॉक 37 टक्के मजबूत झाला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. 21 नोव्हेंबर 2023 रोजी जिओ फायनान्शिअल कंपनीने CIC दर्जा मिळवण्यासाठी RBI कडे अर्ज सादर केला होता. आता RBI ने जिओ फायनान्शिअल कंपनीला CIC दर्जा बहाल केला आहे.

जिओ फायनान्शिअल ही कंपनी Jio Payment Solutions Ltd, Jio Payments Bank, Jio Insurance Broking Ltd, Jio Finance आणि Jio Leasing या उपकंपन्याद्वारे वित्तीय सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. CIC म्हणून जिओ फायनान्शिअल कंपनी किरकोळ कर्ज, व्यापारी कर्ज, भाडेपट्टी, पेमेंट्स बँक ऑपरेशन्स, पेमेंट्स सोल्यूशन्स आणि विमा ब्रोकिंग या क्षेत्रात व्यवसाय करु शकते. नुकताच या कंपनीने BlackRock सोबत देखील संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा करार केला आहे.

RBI च्या नियमांनुसार जिओ फायनान्शिअल कंपनी जुलै 2023 मध्ये RIL मधून विलग झाली होती. बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह नंतर जिओ फायनान्शिअल ही देशातील तिसरी सर्वात मोठी सूचीबद्ध NBFC कंपनी बनली आहे. जून तिमाहीत जिओ फायनान्शिअल कंपनीच्या निव्वळ नफ्यात 6 टक्के घसरण झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 331.92 कोटी रुपये नफा कमावला होता. मार्च तिमाहीत या कंपनीचा नफा 310.6 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

News Title | Jio Finance Share Price NSE Live 19 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x