30 December 2024 10:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका Business Idea | गृहिणींसाठी कमी गुंतवणूक आणि जास्त नफा असलेले टॉप 4 व्यवसाय, आजपासूनच सुरुवात करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATAPOWER NTPC Share Price | NTPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: APOLLO
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | सलग पाच दिवस शेअर बाजार घसरणीसह बंद झाल्याने गुंतवणूकदार चांगल्या शेअर्सच्या शोधात आहेत. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी ३६४ अंकांनी घसरून २३५८७ वर बंद झाला होता. विशेष म्हणजे मिडकॅप निर्देशांक १६५० अंकांनी घसरला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत.

Yatharth Hospital Share Price – NSE: YATHARTH

स्टॉक मार्केट तज्ज्ञ अंबरीश बालिगा यांनी यथार्थ हॉस्पिटल लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सध्या यथार्थ हॉस्पिटल कंपनी शेअर 626 रुपयांवर ट्रेड करतोय. अंबरीश बालिगा यांनी यथार्थ हॉस्पिटल कंपनी शेअरसाठी 792 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे हा शेअर गुंतवणूकदारांना 27 टक्के परतावा देऊ शकतो. गेल्या ५ वर्षांत कंपनीच्या नफ्यात ९६ टक्के आणि महसुलात ४७ टक्के वाढ झाली आहे. यथार्थ हॉस्पिटल कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल देखील दमदार होते. यथार्थ हॉस्पिटल कंपनी दिल्ली-एनसीआरमध्ये हॉस्पिटल चेन चालवते. या कंपनीच्या हॉस्पिटलची सध्याची क्षमता १६०० खाटांची असून आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत ती ३००० खाटांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आहे. यथार्थ हॉस्पिटल कंपनी कंपनी कर्जमुक्त आहे.

PN Gadgil Jewellers Share Price – NSE: PNGJL

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ९५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड कंपनी शेअर सध्या 707 रुपयांवर ट्रेड करतोय. म्हणजे हा शेअर गुंतवणूकदारांना 34% परतावा देऊ शकतो.

Grindwell Norton Share Price – NSE: GRINDWELL

स्टॉक मार्केट तज्ज्ञ अंबरीश बालिगा यांनी ग्रिंडवेल नॉर्टन लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सध्या ग्रिंडवेल नॉर्टन लिमिटेड कंपनी शेअर 2,049.75 रुपयांवर ट्रेड करतोय. ग्रिंडवेल नॉर्टन लिमिटेड कंपनीचा कॅशफ्लो देखील सकारात्मक आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा आर्थिक निकाल थोडा नकारात्मक होता, मात्र शेअर प्राईसवर जास्त नकारात्मक परिणाम झाला नाही. ग्रिंडवेल नॉर्टन लिमिटेड कंपनी कर्जमुक्त आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ अंबरीश बालिगा यांच्या मते हा शेअर पुढील ९ ते १२ महिन्यांत २९०० रुपयांपर्यंत वाढू शकतो. म्हणजे गुंतवणूकदारांना ४५ टक्के परतावा मिळू शकतो.

Jio Finance Share Price – NSE: JIOFIN

शेअर मार्केट विश्लेषकांनी जिओ फायनान्शियल स्टॉकसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते जिओ फायनान्शियल कंपनी शेअर ३७५ रुपये टार्गेट प्राईस गाठू शकतो. सध्या हा शेअर 305.40 रुपयांवर ट्रेड करतोय. हा शेअर लवकरच ब्रेकआऊट देऊ शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 394.70 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 229 रुपये होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price Saturday 21 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x