23 January 2025 11:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर 2.97 टक्क्यांनी घसरून 255 रुपयांवर पोहोचला होता. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,62,518 कोटी रुपये आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 394.70 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 237.10 रुपये होती.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरची ट्रेडिंग रेंज

25 ऑगस्ट 2023 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर 214.50 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर 255 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची बुधवारची बंद किंमत 262.80 रुपये होती. गुरुवारी दिवसभरात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर 253.60 रुपये ते 267.40 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात हा शेअर 237.10 रुपये ते 394.70 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरबाबत तज्ज्ञांचे मत

जिओजित फायनान्शियल ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ गौरांग शाह यांनी या शेअरबाबत महत्वाचा सल्ला देताना म्हणाले की, ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही खूप चांगली कंपनी आहे. तसेच या कंपनीचे व्यवस्थापन आणि आर्थिक स्थिती सुद्धा भक्कम आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी भविष्यातील योजनांवर सकारात्मक वाटचाल करत आहे. पुढील काळात ही कंपनी एनबीएफसी क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी बनू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने आता त्यांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे परिणाम आगामी बॅलेन्सशीट वर सुद्धा दिसून येतील.

गौरांग शाह गुंतवणूकदारांना सल्ला देताना पुढे म्हणाले की, ‘गुंतवणूकदारांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर्स लॉन्ग टर्मसाठी खरेदी करावेत. तज्ज्ञांनी या शेअरसाठी 350 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. तसेच २२५ ते २५० रुपयांच्या रेंजमध्ये हा शेअर खरेदी करावा असं देखील गौरांग शाह म्हणाले.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर 7.98% घसरला आहे. मागील १ महिन्यात जिओ फायनान्शियल कंपनी शेअर 16.31% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 23.86% घसरला आहे. मागील १ वर्षात जिओ फायनान्शियल कंपनी शेअरने 6.07 टक्के परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने गुंतवणूकदारांना 18.88 टक्के परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर 16.24% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price Thursday 23 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x