22 February 2025 8:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल
x

Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात किरकोळ तेजीच्या पार्श्वभूमीवर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. बुधवारी सकाळी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमध्ये तेजी दिसून आली होती, मात्र काही वेळाने शेअरमध्ये पुन्हा घसरण दिसून आली.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर सध्याची स्थिती

बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर 1.88 टक्क्यांनी घसरून 255.70 रुपयांवर पोहोचला होता. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची प्रिव्हिअस क्लोजिंग प्राईस 260.10 रुपये होती. बुधवारी दिवसभरात शेअरने 263.60 रुपयांचा उच्चांक गाठला होता. तर शेअरची दिवसभरातील नीचांकी पातळी 254.05 रुपये होती.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी 394.70 रुपये होती, तर शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी 237.10 रुपये होती. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,62,390 कोटी रुपये आहे.

जर तुम्ही जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर्सचे गुंतवणूकदार असाल किंवा या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल याबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट विश्लेषकांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.

तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर्समध्ये कमीत कमी एक ते दोन वर्षांचा दृष्टीकोन असेल तरच गुंतवणूक करावी असा सल्ला शेअर बाजार विश्लेषक विवेक कारवान यांनी दिला आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची आर्थिक स्थिती आणि पूर्ण नेटवर्किंग या दोन्ही महत्वाच्या गोष्टी जिओ कंपनीकडे आहेत.

सध्या हा शेअर अत्यंत कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. मागील एक महिन्यात हा शेअर 16.08 टक्क्यांनी घसरला आहे आणि सध्या 255.70 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी आहे. गुंतवणूकदारांनी लॉन्ग टर्म दृष्टीकोन समोर ठेऊन जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. तसेच शेअरमध्ये घसरण झाल्यास अधिक शेअर्स खरेदी करावेत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सध्याच्या पातळीवर या कंपनीचे शेअर्स मूल्यांकनाच्या दृष्टीने वाजवी वाटत आहेत. त्यामुळे विश्लेषकांनी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price Wednesday 22 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x