18 November 2024 8:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Jio Financial Services Share Price | जेएफएसएल शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर

Jio Financial Services Share Price

Jio Financial Services Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजेच जेएफएसएल कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )

आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 1.5 टक्के वाढीसह 378.70 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 1.19 टक्के वाढीसह 373.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधरच्या तज्ञांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक 387 रुपये किमतीच्या पार गेला तर, अल्पावधीत शेअर 408 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअरमध्ये 352 रुपये किमतीवर मजबूत समर्थन पाहायला मिळत आहे. तर 393 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स पुढील काळात 432 रुपये किमतीवर जाऊ शकतात. पुढील एका महिन्यासाठी या शेअरची ट्रेडिंग रेंज 350 रुपये ते 435 रुपये असेल. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 58 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील तीन महिन्यांत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉकची किंमत 52.66 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 64.46 टक्क्यांनी वाढले होते. तर या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 378.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 204.65 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,36,215.11 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Services Share Price NSE Live 09 April 2024.

हॅशटॅग्स

#Jio Financial Services Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x