16 November 2024 4:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल मोठा परतावा - NSE: TATASTEEL SBI Mutual Fund | SBI योजनेचा दमदार फंड, 1 लाखाचे झाले 55 लाख तर, 2500 च्या SIP ने दिले 1 करोड रुपये - Marathi News Jio Finance Share Price | शेअरची रॉकेट तेजी वाढणार, जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अजून एक अपडेट - NSE: JIOFIN
x

Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय?

Jio Financial Services Share Price

Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्याच्या वाढीसह 385 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपले मार्च तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केले आहेत. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )

मार्च 2024 तिमाहीत कंपनीने 6 टक्के वाढीसह 311 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 294 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉक 1.83 टक्के वाढीसह 389.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने 418 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 414 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचा खर्च 99 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर आता मार्च तिमाहीत कंपनीचा खर्च 103 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अनेक पट वाढून 1,605 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने ॲसेट मॅनेजमेंट आणि ब्रोकिंग बिझनेस सुरू करण्यासाठी ब्लॅकरॉक या जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूक कंपनीसोबत 50:50 भागीदारीत जॉइंट व्हेंचर स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ब्लॅकरॉक ही अमेरिकन कंपनी जगातील सर्वात मोठी गुंतवणूक कंपनी मानली जाते. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक यांच्यात संपत्ती व्यवस्थापन कंपनी आणि ब्रोकरेज फर्म स्थापन करण्यासाठी 50:50 भागीदारीमध्ये करार झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Services Share Price NSE Live 23 April 2024.

हॅशटॅग्स

#Jio Financial Services Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x