24 December 2024 11:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल शेअर्सची बंपर खरेदी, पुढील काळात मजबूत कमाई करून देणार, कारण काय?

Jio Financial Share Price

Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मधून डी झाल्यावर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध करण्यात आले होते. सुरुवातीला या स्टॉकमध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. मात्र मागील 5 ट्रेडिंग सेशनपासून हा स्टॉक सतत अप्पर सर्किट तोडत आहे. आज देखील जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 8.84 टक्क्यांच्या वाढीसह 267 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के वाढीसह 256.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सोमवारी सेबीने जिओ फायनान्शियल कंपनीचा सर्किट फिल्टर 5 टक्क्यांवरून वाढवून 20 टक्केवर आणला आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. स्टॉक लिस्टिंगच्या वेळी जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 265 रुपये किमतीवर ओपन झाले होते. सध्या जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स आपल्या लिस्टिंग किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत.

नुकताच सेबीने जिओ फायनान्शियल स्टॉकची सर्किट फिल्टर 20 टक्केवर ठेवली आहे. मात्र शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 20 टक्के अपर लोअर सर्किट स्पर्श करणार नाही. त्यामळे या कंपनीचे शेअर्स निफ्टी आणि इतर निर्देशांकातून बाहेर सहन बाहेर पडू शकतात. यात कोणतीही अडचण येणार नाही.

सोमवार आणि मंगळवार च्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला नसेल तर त्याला निफ्टी निर्देशांकातून वगळले जाईल. ब्रोकरेज फर्म नुवामाने आपल्या अहवालात माहिती दिली होती की, निफ्टी इंडेक्समधून जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स वगळण्यासाठी 110 दशलक्ष शेअर्सची विक्री करावी लागेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Share Price today on 05 September 2023.

हॅशटॅग्स

Jio Financial Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x