22 February 2025 3:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Jio Financial Share Price| जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची किंमत निश्चित झाली, स्टॉक कधी सूचीबद्ध होणार? सर्व तपशील जाणून घ्या

Jio Financial Share Price

Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही मुकेश अंबानींची कंपनी नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीपासून विलग करण्यात आली आहे. आता या कंपनीचे एकूण बाजार मूल्य 20 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त असल्याची माहिती मिळत आहे. एवढ्या मोठ्या बाजार भांडवलाच्या आधारे जेएफएसएल कंपनी अदानी समूहाच्या सर्व कंपन्या, कोल इंडिया आणि इंडियन ऑइल कंपनीच्या एक पाऊल वरचढ ठरली आहे. याशिवाय टाटा समूहाचा भाग असलेली टाटा स्टील कंपनी देखील जेएफएसएल कंपनीच्या मागे राहिली आहे.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (एनएसई) जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअरची किंमत २७३ रुपये प्रति शेअर असेल. रिलायन्सचा शेअर गुरुवारी विशेष प्री-ओपन सत्रात एनएसईवर २,५८० रुपयांवर स्थिरावल्यानंतर आरआयएलचा शेअर एनएसईवर २,८५३ रुपये (२,८५३ ते २,५८० रुपये) वर बंद झाला होता. बीएसईवर रिलायन्सच्या शेअरचा भाव विशेष प्री-ओपनिंग सेशनमध्ये 2,589 रुपयांवर बंद झाला.

किंमत निश्चिती प्रक्रिया :

नुकताच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन करण्यात आले आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 261.85 रुपये निश्चित करण्यात आली आहे. आज शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.48 टक्के घसरणीसह 2,555.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेसमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2,841.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नियमित व्यवहार सुरू होण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या एक तासाच्या विशेष सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 2,580 रुपये किमतीवर क्लोज झाले. या किमतीतील फरक 261.85 रुपये हीच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत निश्चित करण्यात आली.

जिओचा दबदबा :

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने शेअर बाजारातील अनेक मोठ्या कंपन्यांना बाजार मूल्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. Jio Financial Services कंपनीच्या शेअर्सचे एकूण मूल्य 1,66,000 कोटी रुपये अधिक आहे. या मूल्यांकनासह , जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने शेअर बाजार भांडवलानुसार भारतातील 32 वी सर्वात मोठी कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. अशाप्रकारे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आता अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, टाटा स्टील, कोल इंडिया, एचडीएफसी लाईफ, इंडियन ऑइल, बजाज ऑटो यांच्या पेक्षा पुढे निघाली आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स लवकरच शेअर बाजारात ट्रेडिंगसाठी उपलब्ध होणार आहेत. हा स्टॉक सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमधे शेअर बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी देशातील सर्वात मोठी बाजार भांडवल असलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आता आपल्या वित्तीय सेवा युनिट शिवाय स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Share Price today on 21 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jio Financial Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x