24 December 2024 9:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

JP Associates Share Price | शेअर प्राईस 13 रुपये, स्टॉक अजून स्वस्त झाला, अशी संधी सोडू नका, पुढे मोठी कमाई

JP Associates Share Price

JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5.4 टक्के वाढीसह 15:57 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र आज जयप्रकाश असोसिएट्स स्टॉक 10 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 15 टक्के घसरली आहे. ( जयप्रकाश असोसिएट्स कंपनी अंश )

2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 27 टक्के कमजोर झाले आहेत. जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड कंपनीची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 27.17 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 7.15 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,797,26 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी जयप्रकाश असोसिएट्स स्टॉक 9.80 टक्के घसरणीसह 13.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. एका वर्षभरापूर्वी या कंपनीचे शेअर 7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच हा स्टॉक 15.57 रुपये किंमत स्पर्श करून खाली आला आहे. मागील पाच वर्षांत जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 260 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात हा स्टॉक 4 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर आला आहे.

2008 मध्ये जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे 300 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक तब्बल 95 टक्के खाली आला होता. नुकताच आलेल्या बातमीनुसार जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने मुद्दल आणि व्याजाच्या रकमेसह 4,616 कोटी रुपये कर्ज थकीत ठेवले आहे. 30 एप्रिल रोजी जयप्रकाश असोसिएट्स कंपनीला 1,751 कोटी रुपये कर्जाची मूळ रक्कम आणि 2,865 कोटी रुपये व्याज भरायचे होते, त्यात विलंब झाला आहे.

जयप्रकाश असोसिएट्स कंपनीवर व्याजासकट एकूण कर्ज 29,805 कोटी रुपये आहे. हे कर्ज कंपनीला 2037 पर्यंत फेडायचे आहे. त्यापैकी 30 एप्रिल 2024 पर्यंत कंपनीला 4,616 कोटी रुपये थकीत कर्ज भरायचे होते. जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीवरील 29,805 कोटी रुपये कर्जापैकी 18,955 कोटी रुपये SPV कडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Associates Share Price NSE Live 04 June 2024.

हॅशटॅग्स

JP Associates Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x