3 February 2025 10:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे, सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला, 85 हजारांचा टप्पा ओलांडला, नवे दर तपासून घ्या Adani Power Share Price | तज्ज्ञांकडून अदानी पॉवर शेअरला 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Income Tax Return | स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा कोणाला होतो, जाणून घ्या नव्या आणि जुन्या टॅक्स रिजीममधील मर्यादा किती आहे IPO GMP | स्वस्त आयपीओ आला रे, IPO शेअरचा ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल SBI Home Loan | SBI बँकेकडून 30 लाखांचे गृहकर्ज हवे असेल तर, महिन्याला किती पगार असायला हवा इथे जाणून घ्या Bank Fixed Deposit | संकटकाळी बँकेतील FD मोडण्यापेक्षा 'या' गोष्टी करा, मुद्दलसह व्याज वाचेल, फायदा होईल Mutual Fund SIP | 4 वर्षांच्या आत मिळतील 50 लाख रुपये, कशा पद्धतीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक कराल, इथे पहा
x

JP Power Share Price | या पेनी शेअरची किंमत वडापाव पेक्षा स्वस्त, 'पॉवरफुल' आहे जेपी पॉवर शेअर, 1 महिन्यात दिला 54% परतावा

JP Power Share Price

JP Power Share Price | जेपी पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

मागील काही दिवसांपासून जेपी पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून देत आहेत. आज गुरूवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी जेपी पॉवर व्हेंचर्स स्टॉक 5.78 टक्के वाढीसह 14.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका महिन्यात जेपी पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 54.70 टक्के परतावा कमावून दिला आहे. एका महिनाभरापूर्वी या कंपनीचे शेअर 9.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात हा स्टॉक 54.70 टक्के वाढून 14 रुपये किमतीवर पोहचला आहे. जेपी पॉवर व्हेंचर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9711 कोटी रुपये आहे. 27 मार्च 2020 रोजी जेपी पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 50 पैशांवर ट्रेड करत होते.

मागील सहा महिन्यांत जेपी पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. 8 मे 2023 रोजी जेपी पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 5.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 135.29 टक्के वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जेपी पॉवर व्हेंचर्स स्टॉक 81.82 टक्के वाढला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 85.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. 9 नोव्हेंबर 2018 रोजी जेपी पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 2.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या किमतींवरून हा स्टॉक तब्बल 508.70 टक्के वाढला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 14.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.15 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Power Share Price NSE 09 November 2023.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x