3 February 2025 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | SBI बँकेकडून 30 लाखांचे गृहकर्ज हवे असेल तर, महिन्याला किती पगार असायला हवा इथे जाणून घ्या Bank Fixed Deposit | संकटकाळी बँकेतील FD मोडण्यापेक्षा 'या' गोष्टी करा, मुद्दलसह व्याज वाचेल, फायदा होईल Mutual Fund SIP | 4 वर्षांच्या आत मिळतील 50 लाख रुपये, कशा पद्धतीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक कराल, इथे पहा Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, मजबूत कमाईची संधी Tata Motors Share Price | टाटा मोटर्सचे शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, ब्रोकरेजने दिली बाय रेटिंग - NSE: TATAMOTORS Govt Employees Salary | सरकारी कर्मचाऱ्यांचे 14 लाख रुपयेपर्यंतचे उत्पन्नही टॅक्स फ्री होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Vedanta Share Price | डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'ट्रेड वॉर'ने चिंता वाढली, मेटल क्षेत्रातील शेअर्स घसरले - NSE: VEDL
x

JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 700% परतावा

JP Power Share Price

JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मात्र दीर्घ मुदतीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 23.99 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.72 रुपये होती. ( जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनी अंश )

2024 मध्ये या स्टॉकने गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 230 टक्के वाढली आहे. तर मागील तीन वर्षात जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 400 टक्के वाढवले आहेत. शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स स्टॉक 0.78 टक्के वाढीसह 19.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील 5 वर्षात जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2007 मध्ये या कंपनीचे शेअर्स 136 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 85 टक्के खाली आला आहे. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड ही कंपनी जेपी ग्रुपचा एक भाग आहे. ही कंपनी मुख्यतः ऊर्जा प्रकल्प उभरणीशी संबंधित व्यवसाय करते.

नुकताच जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीने पुन्हा एकदा सुरेन जैन याना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली आहे. यासह कंपनीने सुनील कुमार शर्मा यांना एप्रिल 2024 पासून एक वर्षासाठी कार्यकारी संचालक म्हणून पुनर्नियुक्त केले आहे. कंपनीने प्रवीण कुमार सिंग यांना पाच वर्षांसाठी कार्यकारी संचालक म्हणून पुनर्नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि दिनेश कुमार लिखी यांना 6 ऑगस्ट 2024 पासून तीन वर्षांसाठी बिगर कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्त करण्याची घोषणा केली आहे.

मार्च 2024 तिमाहीत जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीने 588.79 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एका वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 43.99 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीचे एकूण उत्पन्न 1863.63 कोटी रुपये नोंदवले गेले होते. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचा नफा 1,021.95 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Power Share Price NSE Live 01 June 2024.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x