18 November 2024 1:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर सहित हे 5 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा

JP Power Share Price

JP Power Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मालामाल होऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला पॉवर सेक्टरमधील टॉप 5 शेअर्सबाबत माहिती देणार आहोत. हे शेअर्स पुढील 5-10 वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढू शकतात. नवीकरणीय ऊर्जा स्रोतांमध्ये भारताच्या हरित ऊर्जेच्या प्रयत्नांना पुढे नेण्यात सौर ऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

भारत सरकारने 2030 पर्यंत देशाची अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता 3 पट वाढवून 500 GW वर नेण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यापैकी सौर क्षमता 292 GW आणि पवन ऊर्जा क्षमता 100 GW आहे. Wari Renewable Technologies सारख्या सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 994.67 टक्केपर्यंत परतावा कमावून दिला आहे.

सुराणा सोलर :
सध्या पॉवर सेक्टरमध्ये या कंपनीच्या शेअर्सची बोलबाला सुरू आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 79.86 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 2.29 टक्के कमजोर झाले आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 38.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.05 टक्के वाढीसह 39.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी भारतातील सौर फोटोव्होल्टेइक मॉड्यूल्सचे उतादान करणारी दिग्गज कंपनी आहे.

सुझलॉन एनर्जी :
मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1,088 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 52.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 53.39 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीची स्थापना 1995 साली झाली होती. ही कंपनी जागतिक नवीकरणीय ऊर्जा पुरवठादारांपैकी एक आहे.

उर्जा ग्लोबल :
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 107.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 21.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 21.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. उर्जा ग्लोबल लिमिटेड ही कंपनी मुख्यतः ग्रिड कनेक्टेड सोलर पॉवर प्लांट्सचे डिझाईन, सल्ला, एकत्रीकरण, पुरवठा, स्थापना, कार्यान्वित आणि देखभाल या व्यावयात गुंतलेली आहे.

जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स :
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 213 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 1.34 टक्के घसरला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 19.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 19.72 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 13.68 हजार कोटी रुपये आहे.

RatanIndia Enterprise :
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 97.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 11.82 टक्के वाढले आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 81.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.37 टक्के वाढीसह 82.28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी पूर्वी RatanIndia इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या नावाने ओळखली जात होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Power Share Price NSE Live 03 July 2024.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x