30 January 2025 6:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झालाय, मग इथे लक्ष द्या, तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होईल EPFO Passbook | पगारदारांच्या खात्यात EPF चे 1.07 कोटी रुपये जमा होणार, महिना 25,000 रुपये नोकरदारांचाही फायदा होणार 5G Mobile Under 10000 | जबरदस्त 5G स्मार्टफोनसाठी खास ऑफर, खिशाला परवडतील 'हे' स्वस्त 5G स्मार्टफोन्स Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 38 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RPOWER Loan on Aadhar Card | आधार कार्डावरून मिळवता येईल 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज, 'या' योजनेबद्दल ठाऊक आहे का RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
x

Just Dial Share Price Today | अमिताभ बच्चन यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचे शेअर्स वाढणार? शेअरची टार्गेट प्राईस पहा

Just Dial Share Price

Just Dial Share Price Today | ‘ICICI सिक्युरिटीज’ फर्मने नुकताच आपल्या अहवालात ‘जस्ट डायल’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ यांची ही गुंतवणूक आहे. पुढील काळात जस्ट डायल कंपनीचे शेअर्स 870 रुपयेपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.42 टक्क्यांच्या घसरणीसह 656.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Just Dial Limited)

आज शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के घसरणीसह 657.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसांत या कंपनीचे शेअर्स 0.22 टक्क्यांनी घसरले आहेत. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 27.37 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 940 रुपये आणि नीचांक किंमत पातळी 520 रुपये होती.

सिटी फर्मने ‘जस्ट डायल’ कंपनीच्या शेअरवर 815 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते शेअरचे मूल्यांकन स्वस्त झाले आहे. या व्यतिरिक्त शेअर बाजारातील 10 पैकी 7 तज्ञ ‘जस्ट डायल’ कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करत आहेत. एका तज्ञानी या कंपनीचे शेअर्स विकण्याची शिफारस केली आहे, तर दोन तज्ञ स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला देत आहेत.

गुंतवणुकीवर परतावा :
‘जस्ट डायल’ कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 1150 रुपयांपर्यंत वाढू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. मध्यम कालावधीत हा स्टॉक 825 रुपये किमतीवर जाऊ शकतो, आणि शेअर बाजाराच्या पडत्या काळात हा स्टॉक 629 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Just Dial Share Price Today on 21 April 2023.

हॅशटॅग्स

Just Dial Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x