22 January 2025 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

Jyothy Labs Share Price | मार्ग श्रीमंतीचा! तब्बल 4400% परतावा देणारा शेअर पुन्हा तेजीत, मागील 5 दिवसांत दिला 16% परतावा

Jyothy Labs Share Price

Jyothy Labs Share Price | ज्योती लॅब्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.27 टक्के वाढीसह 418.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. ज्योती लॅब्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15,330 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 107 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात शेअरची किंमत 201 रुपयेवरून वाढून 418 रुपयेवर पोहचली आहे. मागील एका वर्षात ज्योती लॅब कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 118 टक्के नफा कमावून दिला आहे.

31 ऑक्टोबर 2008 रोजी या कंपनीचे शेअर्स 11 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 4400 टक्के वाढला आहे. आज गुरूवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी ज्योती लॅब्स स्टॉक 0.38 टक्के वाढीसह 418.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ज्योती लॅब कंपनीने नुकताच आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीत कंपनीने 11 टक्के वाढीसह 732 कोटी रुपये विक्री नोंदवली आहे. तर कंपनीने 68 टक्क्यांच्या वाढीसह 135 कोटी रुपये नफा कमावला आहे. या तिमाहीत कंपनीने 60 टक्के वाढीसह 104 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. ज्योती लॅब्स ही भारतातील सर्वात मोठ्या FMCG कंपनी पैकी एक आहे. ही कंपनी मुख्यतः फॅब्रिक केअर, डिश वॉशिंग, घरगुती कीटकनाशक आणि पर्सनल केअर उत्पादने बनवण्याचे काम करते.

ज्योती लॅब्स कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत फॅब्रिक केअर सेगमेंटच्या विक्रीमध्ये 11 टक्केची वाढ नोंदवली आहे. ज्योती लॅब्स कंपनीने डिश वॉशिंग सेगमेंटच्या विक्रीमध्ये 10 टक्के वाढ नोंदवली आहे. तर पर्सनल केअर सेगमेंटच्या विक्रीमध्ये 22 टक्के आणि घरगुती कीटकनाशकांच्या व्यवसायात 3.4 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ज्योती लॅब्स कंपनीच्या शेअर्सने जुलै 2023 पासून कमालीची तेजी पकडली आहे. आता या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jyothy Labs Share Price NSE 09 November 2023.

हॅशटॅग्स

Jyothy Labs Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x