17 April 2025 7:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Kaka Industries IPO | काका इंडस्ट्रीज IPO ला बंपर प्रतिसाद, गुंतवणूकदार एकदिवसात मालामाल होण्याचे संकेत, तपशील जाणून घ्या

Kaka Industries IPO

Kaka Industries IPO | काका इंडस्ट्रीज कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला. बोली प्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशीपर्यंत हा IPO 79.80 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. आतापर्यंत या IPO ला 19.39 कोटी शेअर्सची बोली प्राप्त झाली आहे. IPO मध्ये कंपनीने 36.6 लाख शेअर्स जारी केले होते. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 33 पट सबस्क्राईब झाला आहे. (Kaka Industries Share Price)

पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा कोटा 5.71 पट सबस्क्राईब झाला आहे. काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मध्ये गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 54.20 पट सबस्क्राईब झाला आहे. काका इंडस्ट्रीज कंपनीचा IPO 10 जुलै 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

ज्या गुंतवणुकदारांना IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करायची आहे, ते 10 ते 12 जुलै दरम्यान काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. काका इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या IPO इश्यूसाठी प्रति इक्विटी शेअर 55 ते 58 रुपये किंमत बँड निश्चित केली आहे. काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मध्ये एक लॉट अंतर्गत 2,000 शेअर्स जारी करण्यात आले आहे.

काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO चा आकार 21.23 कोटी रुपये आहे. तर या कंपनीचे IPO शेअर्स 20 जुलै 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. 17 जुलै पासून कंपनी गुंतवणुकदारांना शेअर वाटप करायला सुरुवात करेल. आणि 18 जुलै पासून ज्यांना स्टॉक मिळाले नाही त्यांना पैसे परत केले जातील. 19 जुलै रोजी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा होतील.

काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना काका इंडस्ट्रीज कंपनीच्या आयपीओचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. आणि हेम सिक्युरिटीज लिमिटेड यांना IPO चे प्रमुख व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. काका इंडस्ट्रीज कंपनी पार्टीशन्स, फॉल्स सीलिंग, वॉल पॅनेलिंग, किचन कॅबिनेट, दरवाजे, खिडक्या आणि इतर अंतर्गत आणि बाह्य कामांमध्ये वापरले जाणारे पॉलिमर बनवण्याचे काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kaka Industries IPO GMP Today on 12 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Kaka Industries IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या