30 January 2025 6:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झालाय, मग इथे लक्ष द्या, तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होईल EPFO Passbook | पगारदारांच्या खात्यात EPF चे 1.07 कोटी रुपये जमा होणार, महिना 25,000 रुपये नोकरदारांचाही फायदा होणार 5G Mobile Under 10000 | जबरदस्त 5G स्मार्टफोनसाठी खास ऑफर, खिशाला परवडतील 'हे' स्वस्त 5G स्मार्टफोन्स Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 38 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RPOWER Loan on Aadhar Card | आधार कार्डावरून मिळवता येईल 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज, 'या' योजनेबद्दल ठाऊक आहे का RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
x

Kalyani Steel Share Price | या शेअरने फक्त 2 दिवसात दिला 23 टक्के परतावा, अजून एक मोठी अपडेट येताच खरेदी तेजीत

Kalyani Steel Share Price

Kalyani Steel Share Price | कल्याणी स्टील्स कंपनीच्या शेअर्समधील तेजीने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे आणि तज्ञ आकर्षित केले आहे. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कल्याणी स्टील्स कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 623.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कल्याणी स्टील्स लिमिटेड कंपनीने ही कामिनेनी स्टील अँड पॉवर इंडिया कंपनीची संपत्ती लिक्विडेशन अंतर्गत ताब्यात घेण्यासाठी लावलेली बोली जिंकली आहे. त्यामुळे आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. आज शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी कल्याणी स्टील्स स्टॉक 2.85 टक्के वाढीसह 613 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कल्याणी स्टील्स कंपनीने सेबीला माहिती दिली की, या नवीन अधिग्रहणासाठी कंपनीला 450 कोटी रुपये पेमेंट करायचे आहे. हे मालमत्ता संपादन 7 एप्रिल 2024 रोजी किंवा त्यापूर्वी करणे अपेक्षित आहे. कल्याणी स्टील्स कंपनीने आपल्या मालमत्तेच्या विक्रीसाठी शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी झालेल्या ई-लिलावात सह घेऊन सर्वात कमी बोली लावली होती. या करारांतर्गत ताब्यात घेण्यात येणाऱ्या मालमत्तेत कामिनेनी स्टील अँड पॉवर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकीच्या इमारती, प्लांट आणि मशिनरी असणार आहे.

मागील पाच दिवसांत कल्याणी स्टील्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 27 टाके वाढली आहे. मागील सहा महिन्यांत कल्याणी स्टील्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 69 टक्के वाढवले आहे.

1 जानेवारी 2024 पासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 23 टक्के वाढली आहे. मागील पाच वर्षांत कल्याणी स्टील्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 185 टक्के परतावा कमावून दिला आहे.

कल्याणी स्टील्स या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 623.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 281.10 रुपये होती. कल्याणी स्टील्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,632.93 कोटी रुपये आहे. कल्याणी स्टील्स लिमिटेड ही कंपनी 3 अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक मूल्य असलेल्या कल्याणी समूहाचा एक भाग आहे. कल्याणी स्टील्स कंपनीची स्थपणा 1973 साली झाली होती. कल्याणी स्टील्स मुख्यतः ब्लास्ट फर्नेस मार्ग वापरून फोर्जिंग आणि अभियांत्रिकी दर्जाच्या कार्बन आणि मिश्र धातु स्टील्सचे उत्पादन करणारी कंपनी आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kalyani Steel Share Price NSE Live 12 January 2024.

हॅशटॅग्स

Kalyani Steel Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x