26 April 2025 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल
x

Kalyani Steel Share Price | टाटा स्टील शेअर्सपेक्षा फायद्याचा शेअर, 1 महिन्यात 45% परतावा दिला, पुढे मल्टिबॅगर होणार

Kalyani Steel Share Price

Kalyani Steel Share Price | कल्याणी स्टील या लोह-पोलाद क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. नुकताच या कंपनीने ओरिसा सरकारसोबत एक एमओयू केला आहे.

या करारानुसार, कल्याणी स्टील कंपनी ओरिसा राज्यात लोह पोलाद उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी 11750 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कल्याणी स्टील कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 888 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी कल्याणी स्टील कंपनीचे शेअर्स 1.28 टक्के वाढीसह 830 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कल्याणी स्टील या लोह आणि पोलाद फोर्जिंगचा व्यापार करणाऱ्या कंपनीने ऑटो पार्ट्स आणि स्टीलच्या 0.7 MTPA उत्पादन संकुलासाठी 6626 कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. या कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कल्याणी स्टील कंपनीने शुक्रवारी ओरिसा सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार कंपनीने 0.7 MTPA इंटिग्रेटेड ॲडव्हान्स्ड स्पेशालिटी स्टील आणि ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स तयार करण्याची योजना आखली आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी कंपनी 6626 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. याशिवाय कल्याणी स्टील कंपनीने एरोस्पेस आणि डिफेन्स पार्ट्स बनवणारे प्लांट उभारण्यासाठी 5124 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

मागील एका वर्षात कल्याणी स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 185 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 308.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 फेब्रुवारी 2024 रोजी कल्याणी स्टील कंपनीच्या शेअर्सची किंमत 888 रुपये किमतीवर पोहचली होती.

मागील 6 महिन्यांत कल्याणी स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 483.75 रुपयेवरून 888 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका महिन्यात कल्याणी स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 281.10 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kalyani Steel Share Price NSE Live 24 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Kalyani Steel Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony